28419
गायिका वैशाली सामंत यांची ११ जानेवारीला संगीत रजनी
‘सकाळ’तर्फे आयोजन : हिंदी व मराठी गीतांची मेजवाणी; ‘लाईव्ह शो’ कोल्हापुरात पहिल्यांदाच
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः बहारदार गाण्यांच्या सादरीकरणाने जगभरात प्रसिद्ध असलेल्या गायिका वैशाली सामंत यांच्या हिंदी-मराठी गीतांची संगीत रजनी आता कोल्हापुरात रंगणार आहे. ‘सकाळ’च्या वतीने ११ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता मार्केट यार्डमधील रामकृष्ण लॉनवर रसिकांना ही मेजवाणी मिळणार आहे. वैशाली सामंत त्यांच्या लोकप्रिय गीतांबरोबरच नवीन गीतेही मैफलीत सादर करणार आहेत.
‘पॉप क्वीन’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या वैशाली सामंतने इंडी-पॉप तसेच पार्श्वगायक या दोन्ही प्रकारांमध्ये एक उत्तम गायिका आणि यशस्वी संगीत दिग्दर्शक म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यांनी चार्ट बस्टरच्या माध्यमातून मराठी-हिंदी फ्युजनची सुरुवात केली. संगीताची प्रचंड आवड असलेल्या वैशाली यांनी वयाच्या आठव्या वर्षांपासून नाट्यसंगीत वादक श्रीमती ज्योत्स्ना मोहिले यांच्याकडे संगीत शिकण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी श्रीमती कट्टी आणि जयंत दातार यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीताचे पाच वर्षे औपचारिक प्रशिक्षण घेतले. गुरू पंडित मनोहर चिमोटे यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीताला आंतरराष्ट्रीय संगीताचे मिश्रण करण्याचे तंत्र शिकून घेतले. ‘ऐका दाजिबा’ या गाण्याने प्रसिद्ध झालेल्या वैशाली यांनी सिनेसृष्टीत मधूर गाण्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी फ्यूजनमधून त्यांच्या सदाबहार गाण्यांसह ‘ऐका दाजिबा’ हा अल्बम प्रसिद्ध झाला. त्याबद्दल त्यांना २००४ मध्ये फेव्हरेट गायिका हा सन्मान मिळाला. त्यानंतरही त्यांचा सांगीतिक प्रवास सुरू राहिला. संगीतकार ए. आर. रेहमान, अजय-अतुल, अशोक पत्की, अवधूत गुप्ते यांच्यासह दिग्गज गायक, गायिकांसोबत त्यांनी गाणी गायली आहेत. सुरांनी परिपूर्ण असलेल्या वैशाली सामंत यांचा ‘लाईव्ह शो’ आता कोल्हापुरात पहिल्यांदाच सादर होणार आहे. सुरेल, मधूर व ताल धरायला लावणाऱ्या गाण्यासह हा कार्यक्रम नृत्याविष्कारानेही सजणार आहे.
‘ऐका दाजिबा’, ‘गोरी गोरी मांडवाखाली’, ‘राधा कैसे ना जले’, ‘ये वादा रहा’ या गाजलेल्या गीतांसोबत हिंदी- राठी गाणी त्या त्यांच्या वेगळ्या अंदाजात सादर करणार आहेत.
चौकट
क्यूआर कोड 28418
तिकीटे ‘बुक माय शो’ ॲपवर उपलब्ध
कार्यक्रमांची तिकिटे बुक माय शो ॲपवर उपलब्ध आहेत. त्यासाठी हा क्यूआर कोड स्कॅन करा. फोन बुकिंगसाठी संपर्क ः प्रतीक ः ९१३०४४६५६६
अधिक माहितीसाठी संपर्क ः सूरज ः ९५५२५८१९१८
-----
दृष्टिक्षेपात कार्यक्रम...
कधी ः ११ जानेवारी २०२५
वेळ ः सायंकाळी सहा वाजता
कोठे ः रामकृष्ण लॉन, मार्केट यार्ड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.