ग्राहक पंचायतीतर्फे
२४ ला निबंध स्पर्धा
गडहिंग्लज : ग्राहक पंचायतीच्या येथील शाखेतर्फे तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त २४ डिसेंबरला ही स्पर्धा होणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन, वरिष्ठ महाविद्यालयीन व खुला अशा तीन गटात ही स्पर्धा होईल. ग्राहक म्हणून माझी अपेक्षा (२०० ते २५० शब्द), ऑनलाईन खरेदीचे फायदे व तोटे किंवा मॉल संस्कृती आणि ग्राहक (३०० ते ३५० शब्द), चळवळीचे सामर्थ्य आणि ग्राहक (४०० ते ४५० शब्द) असे अनुक्रमे तीन गटांसाठी विषय आहेत. पहिल्या तीन विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे. इच्छुकांनी आपले निबंध १६ डिसेंबरपर्यंत तालुका उपाध्यक्ष महादेव ढोकरे-पाटील, सचिव अनिल कलकुटकी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन विभागीय अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी केले आहे.
.........
शिवराजमध्ये भरवला
विद्यार्थ्यांनी मिनी बझार
गडहिंग्लज : येथील शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिनी बझार भरविला होता. संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, प्रा. तानाजी चौगुले यांनी बझारला भेट दिली. मुख्याध्यापक ए. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार ज्ञान मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविल्याचे सांगितले. सुमारे ७० स्टॉलची मांडणी केली होती. पालकांसह ग्राहकांनी खरेदी केली. श्रेयस केंगार याने आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.