कोल्हापूर

गड- आरसीसी गटर अपूर्ण

CD

आरसीसी गटारींचे
७३ लाखांचे काम अपूर्ण

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ ः भडगाव-जरळी-मुगळी- नूल-खणदाळ, नांगनूर राज्य हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आरसीसी गटर बांधण्यासाठी ७३ लाख ५४ हजारांचा निधी मंजूर आहे. त्याचे काम सुरू झाले असले तरी अनेक दिवसांपासून ते बंद आहे. अपूर्ण गटारीमुळे समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार मुगळीचे उमेश कटकोळे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
अर्थसंकल्पीय बजेटमधून या कामाला निधी मिळाला आहे. १७ जानेवारी २०२४ ला काम सुरू झाले. दहा महिन्यांत म्हणजेच १७ नोव्हेंबरला काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र मुदत संपूणही काम अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुगळी गावातील गटर बांधणी अपूर्ण आहे. स्थानिकांनी अनेकवेळा तक्रारी करूनही अद्याप काम सुरू झालेले नाही. सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता आदित्य भोसले यांच्याकडेही काम तत्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. मुदतीत काम पूर्ण न झाल्याने ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक निधीचा अपव्यय होऊ नये यासाठी या अपूर्ण कामाबाबत ठोस निर्णय घ्यावा. याबाबत गांभीर्याने न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. याबाबत उपअभियंता भोसले म्हणाले, ‘झालेल्या कामाची बिले मिळाली नसल्याने काम बंद केल्याचे ठेकेदार सांगत आहे. कामही संथगतीने सुरू केले आहे. परंतु काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असून न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे ठेकेदाराला कळविले आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT