29385
अब्दुला शेख
............
छत्रपती संभाजीनगर, सोलापूर विजयी
राज्य परिवहन महामंडळ क्रिकेट स्पर्धा ः अब्दुला शेखचे दमदार शतक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः राज्य परिवहन महामंडळाच्या क्रिकेट स्पर्धेत मध्यवर्ती कार्यशाळा छत्रपती संभाजीनगर संघाने मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी संघाचा, तर सोलापूर विभागाने जालना विभागाचा पराभव करीत स्पर्धेत आगेकूच केली. सामन्यात सोलापूरच्या अब्दुला शेखने ४८ चेंडूंत ११९ धावांची तडाखेबंद फलंदाजी केली. यात ११ षटकार, नऊ चौकारांचा समावेश होता.
शास्त्रीनगर मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात छत्रपती संभाजीनगर संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १७४ धावा केल्या. यात राजरत्न सोनकांबळेने ५०, महेश वैद्यने ४२, रवींद्र बोर्डेने २९ धावांचे योगदान दिले. दापोडीतर्फे अक्षय उभेने तीन, तर महेश कांबळेने तीन, महेश कांबळे, उमेश पवाडे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. उत्तरादाखल खेळताना दापोडी संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा सर्व संघ २० षटकांत ८ बाद १२७ धावांत आटोपला. यात नीलेश अकोटकरने नाबाद ४५ धावांची एकाकी झुंज दि,. तर मुकेश आवळेने ३९ धावांचे योगदान दिले. संभाजीनगरकडून कर्णधार रवींद्र बोर्डेने भेदक गोलंदाजी करीत तीन, तर संजय नागरगोजे, महेश वैद्य यांनी प्रत्येकी दोन बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केला. सामनावीर म्हणून रवींद्र बोर्डे, लढवय्या खेळाडू म्हणून नीलेश अकोटकर यांचा सन्मान केला.
दुसऱ्या सामन्यात सोलापूर विभागाने जालना विभागाचा २११ धावांनी पराभव केला. सोलापूर विभागाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २९० धावा केल्या. यात अब्दुला शेखने तडाखेबंद फलंदाजी करीत ४८ चेंडूंत ११९ धावा केल्या. हर्षद आठलेने ५७ धावा, रोहन तारापुरकरने ४९ धावा केल्या. गोलंदाजी करताना जालना संघातर्फे वैभव शिरगावकर, योगेश गीते यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. उत्तरादाखल खेळताना जालना विभागाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा सर्व संघ १८.२ षटकांत ७९ धावांत गुंडाळला. यात समाधान चेकेने १८ व राम दांडगेने १२ धावांची भर घातली. सोलापूरकडून श्रीपती होटकर, उमर मुजावर, उमेश पोवार यांनी भेदक गोलंदाजी करीत प्रत्येकी दोन बळी घेत सामना तब्बल २११ धावांनी जिंकला. सामनावीर म्हणून अब्दुला शेख, तर लढवय्या खेळाडू समाधान चेके यांचा सन्मान करण्यात आला.
...............
आजचे सामने
सकाळी ९ वाजता ः सांगली विरुद्ध रायगड विभाग
दुपारी १.३० वाजता ः सोलापूर विभाग विरुद्ध सिंधुदुर्ग विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.