29551
कोल्हापूर : जागतिक अपंग दिनानिमित्त बुद्धिबळ खेळताना मुले.
.....
समर्थ विद्यामंदिरमध्ये दिव्यांगांसाठी स्पर्धा
कोल्हापूर, ता. ७ : जागतिक अपंग दिनानिमित्त हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड संस्थेद्वारा संचालित समर्थ विद्यामंदिर आणि विद्यालय उचगाव (पूर्व) या समावेशित शाळेत जागतिक अपंग दिन साजरा झाला. यावेळी विशेष मुलांमधील उत्साह, आत्मविश्वास आणि कलागुणांना वाव देणारे विविध खेळ घेतले. यात संगीत खुर्ची, बॉल इन दि बकेट, व्हीलचेअर रेस, बुद्धिबळ हे वैयक्तिक खेळ तसेच कॅच दि बॉल, कॅरम, क्रिकेट या सांघिक खेळाचे आयोजन केले. क्रीडा विभागप्रमुख देवानंद भडाळे, सचिन घाडीगावकर यांनी नियोजन केले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. दिव्यांग कर्मचारीदेखील खेळात सहभागी झाले.
...
फोटो : 29552
शहाजी कॉलेजमधील खेळाडूंचे
बॉक्सिंग स्पर्धेत यश
कोल्हापूर, ता. ७ : शिवाजी विद्यापीठ क्रीडा विभाग हॉल येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयामधील सात बॉक्सिंग खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळवले. विजेते खेळाडू असे : गायत्री भड(सुवर्ण), आदित्य जाधव (सुवर्ण), तन्मय कळत्रे (सुवर्ण), राज पाटील - (सुवर्ण), संदेश काटकर (सुवर्ण), प्रणव रोडे (सुवर्ण), ओम हिरूर (सुवर्ण) यांचा समावेश आहे. सर्व सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची पंजाब (भटिंडा) येथे होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली. सर्व खेळाडूंना श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, रजिस्ट्रार रुपेश खाडेकर, प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, डॉ. राहुल मांडणीकर, सहसमन्वयक डॉ. अनिल बलगुडे, जिमखाना विभागप्रमुख डॉ. प्रशांत पाटील, क्रीडा शिक्षक प्रा. प्रशांत मोटे यांचे मार्गदर्शन लाभले.
...
29558
श्रीदत्ताबाळ हायस्कूलच्या खेळाडूंची निवड
कोल्हापूर, ता. ७ : विभागीय क्रीडा कार्यालयामार्फत घेतलेल्या कराटे स्पर्धेत श्रीदत्ताबाळ हायस्कूलमधील १४/१७ वर्षाखालील मुले वयोगटात खेळाडूंनी यश मिळवले. १४ वर्षाखालील गटात सिध्दार्थ जोंधळे तर १७ वर्षाखालील गटात क्षितीज क्षीरसागरनी प्रथम क्रमांक मिळवला.त्यांची धुळे येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली. क्रीडा शिक्षिका स्वाती पाटील, अनुराधा सडोलकर, क्रीडा शिक्षक समीर भोसले यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी देसाई, उपाध्यक्ष वेद देसाई, सचिव नीलेश देसाई, व्यवस्थापक संदीप डोंगरे, मुख्याध्यापक सचिन डवंग, मुख्याध्यापिका रोहिणी शेवाळे, प्रणिता वर्धमाने यांचे प्रोत्साहन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.