कोल्हापूर

पदवी प्रमाणपत्र

CD

शिवाजी विद्यापीठाचा लोगो
...
पदवी प्रमाणपत्र आता इंग्रजीसह मराठी भाषेत

पन्नास हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना दीक्षांत सोहळ्यात मिळणार द्वैभाषिक प्रमाणपत्र

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : यंदापासून शिवाजी विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र मराठी व इंग्रजी भाषेत विद्यार्थ्यांच्या हाती सोपवले जाणार आहे. मुंबई व पुणे विद्यापीठानंतर शिवाजी विद्यापीठात द्वैभाषिक स्वरूपातील प्रमाणपत्र देण्यास सुरुवात होत आहे. त्याबाबतचा निर्णय विद्यापरिषदेत झाला असून, द्वैभाषिक प्रमाणपत्र छापण्यासाठी आवश्‍यक तयारी करण्यात आली आहे.
विद्यापीठाचा ६१ वा दीक्षांत सोहळा येत्या जानेवारी २०२५ मध्ये करण्याची तयारी सुरू आहे. त्यात सुमारे पन्नास हजारहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे दिली जातील, असा अंदाज आहे. त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषेतील पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहे. त्यात काही तांत्रिक चुका राहू नयेत, यासाठी परीक्षा विभाग सतर्कतेने काम करत आहे. द्वैभाषिक प्रमाणपत्र गतवर्षीपासून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते. मात्र, अधिकार मंडळांची मान्यता, पदवी प्रमाणपत्राचा फॉरमॅट निश्‍चितीसाठीची प्रक्रिया लांबली गेल्याने ते देता आले नाही. यंदा प्रशासनाने अधिकार मंडळांच्या मान्यता घेत दोन समित्या नियुक्त केल्या. त्यांच्याकडून पदवी प्रमाणपत्राचा फॉरमॅट मान्य झाला. तसेच विविध विषयांच्या भाषांतराचा विषय अत्यंत काटेकोरपणे हाताळणे आवश्‍यक असल्याने, ती नावे मराठीत करण्याची कसरत पूर्ण करावी लागली आहे. प्रमाणपत्रावर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय प्रशासनाने यापूर्वीच घेतला आहे. परिणामी द्वैभाषिक प्रमाणपत्रावर ते असणार आहेच. शिवाय विद्यार्थ्याचा पीआरएन नंबर असेल.
दरम्यान, पदवी प्रमाणपत्रावर अचूक मराठी नाव येण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रमाणपत्रावर मराठीतील नावे अचूक यावीत व नावातील संभाव्य चुका टाळव्यात, याकरिता मराठी नावांची पडताळणी करण्यासाठी www.unishivaji.ac.in संकेतस्थळावर login मध्ये नावाचा तपशील ७ ते १३ डिसेंबरदरम्यान उपलब्ध करून दिला आहे. तरी विद्यापीठाकडे अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी संकेतस्थळास भेट देऊन नावाचा तपशील अचूक असल्याची खात्री करावी. तसेच आवश्‍यक त्या दुरुस्त्या कराव्यात, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी केले आहे.
...

‘द्वैभाषिक स्वरूपातील प्रमाणपत्र देण्यासाठी गतवर्षी पावले उचलण्यात आली होती. मात्र, ती प्रक्रिया लांबल्याने यंदा त्यात कोणतीही कसूर बाकी ठेवली नाही. अधिकार मंडळांच्या मान्यता घेत द्वैभाषिक स्वरूपातील पदवी प्रमाणपत्र तयार करण्यात येत आहे.
- डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, मोठी भूमिका मांडण्याचं नेमकं कारण काय?

Iran War Impact: युद्धाचे परिणाम! नाशिकमधल्या ४०० कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर; संभाजीनगरमधले उद्योजक म्हणतात, कोरोनासारखी परिस्थिती...

मुलगी झाली हो ! रणदीप-लीनच्या घरी चिमुरडीचं आगमन; लेकीचा पहिला फोटो Viral

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरला युद्धाचा फटका; दरवाढीमुळे महिला आणि हॉटेल व्यावसायिकांच्या खर्चात वाढ

तरुणांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्रात ५,५०६ पदांसाठी मेगा प्राध्यापक भरती होणार; तारीख सांगून महायुती सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT