कोल्हापूर

दत्त जयंती

CD

नृसिंहवाडीत आजपासून
दत्त जयंती सोहळा

१५ डिसेंबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
नृसिंहवाडी, ता. ७ ः येथील दत्त मंदिरात रविवार (ता. ८) ते १५ डिसेंबर अखेर दत्तजयंती उत्सव सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्त भक्तीगीते, गायन, भावगीते, अभंग, तबलावादन, पंचपदी कीर्तन, पालखी सोहळा असे विविध धार्मिक कार्यक्रम दत्त मंदिर परिसरामध्ये भाविकांना अनुभवण्यास मिळणार आहे. भाविकांसाठी दत्त मंदिराच्या दक्षिण- उत्तर बाजूस भव्य सभामंडप, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृह, दर्शन रांगा, महाप्रसाद या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
उत्सव काळामध्ये दररोज दुपारी चार ते पाच या वेळेमध्ये दिलीप शास्त्री उपाध्ये यांचे पुराण तसेच रात्री साडेनऊ ते सव्वा अकरा या कालावधीत भालचंद्र देव केज (आंबेजोगाई) यांचे कीर्तन होणार आहे. याशिवाय भाग्यश्री अनिरुद्ध चरणकर (कोल्हापूर), ॲड. दिलीप प्रभाकर ठाकूर (मालवण), किशोर कुमार फॅन क्लबचे विवेक शेट्टी, मुकुंद बादरायणी (चिंचवड), जोसना गणफुले, प्रफुल गणपुले, श्रद्धा कौस्तुभ जोशी- दांडेकर (मिरज), श्रीया गणेश कुलकर्णी (सांगोला), अमोल निसळ (पुणे) आदी विविध मान्यवरांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी व सचिव संजय पुजारी, सर्व पदाधिकारी उत्सवासाठी परिश्रम घेत आहेत.
ग्रामपंचायत च्या वतीने भाविकांसाठी दोन चाकी व चार चाकी पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून, मुख्य रस्त्यावर बॅरीकेट्स बसवण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी शुद्ध केल्या आहेत. मुख्य चौकातील परिसरात स्वच्छता ठेवण्यात आली आहे. बागेतील जागेची स्वच्छता करण्यात आली असून, त्या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी स्वतंत्र प्रशस्त जागा तयार केली आहे. सरपंच चित्राताई सुतार, उपसरपंच रमेश मोरे, गटनेते धनाजीराव जगदाळे, सदस्य चेतन गवळी व सदस्य यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Road Accident : परदेशात फिरण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं! पुण्यात नोकरी करणाऱ्या बीडच्या पूजाचा थायलंडमध्ये मृत्यू; दुचाकीवरून फिरताना अपघात

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरसाठी पहाटेपासून मोठ्या रांगा

स्पेशल चहा बंद, फक्त 'कटिंग'; गॅस टंचाईचा चहा टपऱ्यांना फटका, तर कामगारावर बेरोजगारीचं संकट

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

किती क्युट! शशांक केतकरची लेक सेम टू सेम त्याच्यासारखीच, नाक, डोळे पाहून नेटकरी म्हणाले... Viral Video

SCROLL FOR NEXT