30335
कोल्हापूर : राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत मार्गदर्शक.
.....
शहाजी महाविद्यालयाचे
बॉक्सिंग स्पर्धेत यश
कोल्हापूर, ता. ११ : अकोला क्रीडा प्रबोधिनी येथे झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागामधील प्रणव देवरे (१२ वी कला) याने ७५ ते ८१ किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक तर यश कुंभार (११ वी कला) याने ४८ ते ५० किलो वजन गटामध्ये ब्राँझ पदक मिळवले. प्रणवची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली.
खेळाडूंना श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मानसिंग बोंद्रे, रजिस्ट्रार रूपेश खाडेकर, रवींद्र भोसले, प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, अधीक्षक मनीष भोसले, डॉ. राहुल मांडणीकर, सहसमन्वयक डॉ. अनिल बलगुडे, प्रभारी पर्यवेक्षक पी. के. पाटील, जिमखाना विभागप्रमुख डॉ. प्रशांत पाटील, क्रीडा शिक्षक प्रा. प्रशांत मोटे यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.