नवीन सेमी इंग्रजी शाळा सुरू करा
प्राथमिक शिक्षक समितीची मागणी; उपायुक्तांना दिले निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः पालकांच्या अपेक्षेनुसार महापालिकेने सेमी इंग्रजीच्या शाळा सुरू कराव्यात. ज्या शाळांनी सेमी इंग्लिश वर्गासाठी परवानगी मागितलेली आहे. त्या सर्व शाळांना परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली. त्याबाबतचे निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने उपायुक्त साधना पाटील यांना दिले.
सेमी इंग्लिश स्कूल सुरू झाल्यामुळे पटसंख्या वाढेल तसेच पालकांना आपल्या पाल्यांना इंग्लिशमधून शिक्षण देणे सोयीचे होणार आहे. गरजेप्रमाणे सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यास परवानगी देऊ. सीसीटीव्ही आणि स्वच्छता गृहसाठी डीपीडीसीमधून निधीसाठी प्रयत्न सुरू आहेत असे उपायुक्त पाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी पगार वेळेवर मिळावा. शाळांची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यासाठी आवश्यक निधी द्यावा. काही शाळांच्यामध्ये शिक्षकांचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे अशा ठिकाणी शिक्षक द्यावेत. पटसंख्या वाढीसाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी विशेष लक्ष महापालिकेने द्यावे. वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे. पर्यवेक्षक व मुख्याध्यापक रिक्त पदे त्वरित भरावीत. शाळांना स्वच्छतेसाठी सेवक द्यावेत. वेतन आयोगातील थकीत फरक रक्कम द्यावी. याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक लावण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
शिक्षक समितीचे राज्यप्रमुख सुधाकर सावंत, शहराध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस संजय कडगावे, कार्याध्यक्ष सुभाष धादवड, कोषाध्यक्ष वसंत आडके, फारुक डबीर, विनोदकुमार भोंग, राज्य प्रतिनिधी उत्तम कुंभार, उमर जमादार उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.