कोल्हापूर

निधन वृत्त

CD

31042
डॉ. संभाजी खराट यांचे निधन
कोल्हापूर, ता. ११ ः माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांचे अल्पशा आजाराने नवी मुंबईत रुग्णालयामध्ये ‍निधन झाले. डॉ. खराट गतवर्षी येथील विभागीय माहिती कार्यालयातून उपसंचालक पदावरुन निवृत्त झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.
डॉ. खराट यांच्या नोकरीची सुरुवात येथूनच झाली. १९९८ ला ते विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथे सहायक संचालक पदावर रुजू झाले. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी व ठाणे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून तर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई येथे वरिष्ठ सहायक संचालक म्हणून सेवा बजावल्यानंतर पदोन्नतीने ते दहा ऑक्टोबर २०२१ ला उपसंचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथे रुजू झाले होते. महात्मा फुले व इतर विषयांवर त्यांनी तीसहून अधिक पुस्तके लिहिली असून लातूर येथे २०१३ मध्ये झालेल्या आठव्या सत्यशोधकी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

31033
बळवंत संकपाळ
कोल्हापूर ः कसबेकर पार्क येथील बळवंत गणपती संकपाळ (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १२) आहे.

09298
कल्पना नलवडे
कंदलगाव : तामगाव (ता. करवीर) येथील कल्पना रामचंद्र नलवडे (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १२) आहे.


30973
पांडुरंग इंगवले
कोल्हापूर : न्यू पॅलेस येथील पांडुरंग श्रीपती इंगवले यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १२) आहे.

01272
नानुबाई पाडळकर
प्रयाग चिखली ः येथील नानुबाई गणपत पाडळकर (वय ८५) निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १२) प्रयाग संगम येथे आहे.

30969
लक्ष्मण आरसेकर
कोल्हापूर : मुक्त सैनिक वसाहत येथील लक्ष्मण भाऊराव आरसेकर (वय ९१) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १२) आहे.

30971
आनंदराव लोहार
कोल्हापूर : रंकाळा रोड येथील आनंदराव गोविंद लोहार (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १२) आहे.

05343
सोनाबाई पाटील
सोनाळी : हसूर दुमाला (ता. करवीर) येथील सोनाबाई शंकर पाटील (वय ८७ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १२ ) आहे.

30978
राधाबाई सकट
कोल्हापूर : कावणे येथील राधाबाई नारायण सकट यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

02575
प्रकाश केसरकर
पेठवडगाव : येथील प्रकाश बापूसो केसरकर (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १२) आहे.

31019
अशोक चोपडे
कोल्हापूर : संकपाळ नगर, कसबा बावडा येथील अशोक गणपती चोपडे (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.


31021
राजाराम देशमुख
कोल्हापूर : के. एम. टी कॉलनी, पाचगाव येथील राजाराम पांडुरंग देशमुख (वय ७४) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १२) आहे.

31022
वालुबाई सकट
कोल्हापूर : कावणे येथील वालुबाई कोंडीबा सकट (वय ८५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १२) आहे.

31032
छाया जाधव
कोल्हापूर : मंगळवार पेठ देवणे गल्लीतील छाया विलास जाधव (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.

31034
निर्मला दिंडे
कोल्हापूर : मंगळवार पेठ, बेलबाग येथील निर्मला राजन दिंडे (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन गुरुवार (ता. १२) आहे.

11008
आक्काताई जाधव
घुणकी : येथील आक्काताई आत्माराम जाधव (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परीवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १३)
आहे

04167
रामचंद्र पाटील
शाहूनगर ः काैलव (ता.राधानगरी) येथील रामचंद्र ज्ञानदेव पाटील (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १२) आहे.

02475
अरुण माळवी
कसबा तारळे : गुडाळ (ता. राधानगरी) येथील अरुण बापूसाहेब माळवी (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, भाऊ, भावजय, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १२ ) आहे.

01732
श्रीपती निरुखे
भुये : भुयेवाडी (ता. करवीर) येथील श्रीपती ज्ञानू निरुखे (वय ९६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १३) आहे.

01818
सुमन कुंभार
सरूड ः येथील सुमन ज्ञानदेव कुंभार (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १३) आहे.

06429
शामराव हळदकर
कोनवडे : कुर (ता. भुदरगड) येथील शामराव सखाराम हळदकर (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. प्राथ. शिक्षक बँकेचे संचालक बाळकृष्ण हळदकर यांचे यांचे ते वडील होत.

05278
तुळसाबाई चव्हाण.
पुनाळ ः काटेभोगाव पैकी पानारवाडी (ता. पन्हाळा) येथील तुळसाबाई शिवाजी चव्हाण (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

04837
अनुसया चौगले
सरवडे : तिटवे (ता. राधानगरी) येथील अनुसया आकाराम चौगले (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार विवाहित मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

02473
हरी पाटील-वाडकर
कसबा तारळे : गुडाळ (ता. राधानगरी) येथील हरी लक्ष्मण पाटील-वाडकर (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT