फोटो 31030
मानवतेची जपणूक करणे सर्वांची
जबाबदारी ः सरोजकुमार मिठारी
सकाळ वृत्तसेवा
गोकुळ शिरगाव, ता. ११ : ‘संत ज्ञानेश्वर ते आधुनिक संत गाडगेबाबा यांनी शिकवणुकीतून मानवतेचा संदेश दिला. याची जपणूक करणे हे समाज म्हणून आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे संपादक सरोजकुमार मिठारी यांनी केले.
गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथे श्री दत्तगुरु भजनी मंडळातर्फे ‘भारतीय संस्कृती आणि संतविचार’ या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. मिठारी म्हणाले, ‘संस्कृती हे सामायिक धन असते आणि ती घडवण्यात समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग असतो. आपल्या परंपरांबद्दल आपल्याला अभिमान असतो, मात्र या परंपरा अखेर मनुष्यनिर्मित असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये काही अपुरेपणाही असू शकतो. हे वास्तव स्वीकारून अखिल मानवतेच्या दृष्टीने काही चांगले बदल घडत असतील तर ते स्वीकारले पाहिजेत.’
मिठारी यांनी स्पर्धा परीक्षांसाठी मुलांनी घ्यावयाची काळजी याबद्दलही मार्गदर्शन केले. एकनाथ डावरे, राजेंद्र कदम, संभाजी पाटील, महादेव चव्हाण, दिनकर पाटील, रवींद्र मिठारी, यशवंत जाधव, उत्तम डावरे, बाजीराव बावडेकर, विजय मिठारी, संतोष कागले, अमित पाटील आदी उपस्थित होते. रवींद्र मिठारी यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णात पाटील यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.