कोल्हापूर

मुरुडेश्वर

CD

कारवारच्या चार शालेय विद्यार्थिनींचा
मुरुडेश्वर येथे समुद्रात बुडून मृत्यू

सहा शिक्षकांचे निलंबन; सहलीवेळी घटना

बंगळूर, ता. ११ : कारवार (उत्तर कन्नड) जिल्ह्यातील मुरुडेश्वर येथे शैक्षणिक सहलीला जात असताना कोलार येथील निवासी शाळेतील नववीच्या वर्गातील चार विद्यार्थिनींचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. कोलार जिल्ह्यातील मूळबागीलू मोरारजी देसाई निवासी शाळेतील ४६ विद्यार्थिनी आणि सहा शिक्षक शाळेच्या सहलीचा एक भाग म्हणून मंगळवारी मुरुडेश्वरला गेले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शिक्षक विद्यार्थ्यांसह समुद्रकिनारी गेले होते. जीवरक्षकांच्या इशाऱ्यानंतरही सात विद्यार्थिनी समुद्रात गेल्या आणि लाटांबरोबर वाहून गेल्या. जीवरक्षक आणि इतर यंत्रणांच्या मदतीने तीन विद्यार्थिनींची सुटका करण्यात आली; पण चार विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी एका विद्यार्थिनीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. बुधवारी जीवरक्षक, होमगार्ड, मच्छीमार आणि पोलिसांचा समावेश असलेल्या पथकाने शोध मोहीम राबवून पहाटे तीन विद्यार्थिनींचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि कर्तव्यात कसूर केलेल्या सर्व सहा शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. या शिक्षकांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. या घटनेसंदर्भात निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका शशिकला आणि अतिथी शिक्षक आणि ड गटातील कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून चौकशीचे आदेश दिले आहेत. शवविच्छेदन पूर्ण झाली असून मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची व्यवस्था केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला नवी गाडी घेताय? वाहन खरेदीसाठी अमृत वेळ, शुभ मुहूर्त, राशीनुसार योग्य रंग...सर्वकाही पाहा एका क्लिकवर

प्रसिद्ध मसाला ब्रँड वादाच्या भोवऱ्यात; चाचणीत ‘एंटरबॅक्टेरिएसी’ जिवाणू आढळल्याचा दावा, हा बॅक्टेरिया नेमका काय आणि आरोग्यासाठी किती धोकादायक?

Latest Marathi News Live Update : गरवारे परिसरात अतिक्रमण निर्मूलन पथकावर दगडफेक

Paduka Darshan Mumbai : मुंबईत दोनदिवसीय ‘भक्तीचा महाकुंभ’,‘भक्ती-शक्ती व्यासपीठा’तर्फे संत आणि सद्‍गुरू पादुकांच्या दर्शनाची संधी

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला आला फ्रॉड कॉल, फिरकी घेत म्हणायला लावलं मराठी गाणं, व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल

SCROLL FOR NEXT