31020
कोल्हापूर : युवा सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजित ‘किल्ला बनवा’ स्पर्धेतील विजेत्यांसोबत शिवसेनेचे उपनेते संजय पवार, युवा सेना विभागीय सचिव अविनाश बलकवडे, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, अवधूत साळोखे, मनजित माने, शशिकांत बिडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
.........................
राजे संभाजी तरुण मंडळ
गड-किल्ला स्पर्धेत प्रथम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः कोल्हापूर युवा सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या किल्ले बनविणाऱ्या युवकांसाठी आयोजित गड-किल्ला स्पर्धेत शिवाजी पेठेतील राजे संभाजी तरुण मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला.
स्पर्धेत एकूण ५२ तरुण मंडळांनी सहभाग घेतला. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध गडकिल्ल्यांची प्रतिकृती साकारली. त्यात राजे संभाजी तरुण मंडळ शिवाजी पेठ (प्रथम), जुना बुधवार तालीम प्रणित फायटर स्पोर्टस (दुसरा), विजेता तरुण मंडळ (तिसरा), जय हनुमान भक्त मंडळ, जाधववाडी (चौथा), किल्ला बॉईज, पाचगाव (पाचवा), हिंदवी स्पोर्टस् क्लब, विचारेमाळ(सहावा), उत्तेजनार्थ एमजी बॉईज मर्दानी खेळ आखाडा, शेषनारायण तरुण मंडळ, मंगळवार पेठ यांचा, तर उत्कृष्ट सादरीकरण- छत्रपती राजाराम तरुण मंडळ, उजळाईवाडी, मावळा ग्रुप, राजोपाध्येनगर (विशेष आकर्षण) यांचा विजेत्यांमध्ये समावेश होता.
स्पर्धेचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने यानी केले. क्रीडा अधिकारीपदी निवड झालेल्या स्नेहल चौगुले हिचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शिवसेना उपनेते संजय पवार, युवासेना विभागीय सचिव अविनाश बलकवडे, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या हस्ते विजेत्यांना चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, महिला आघाडी उपतालुकाप्रमुख अनिता ठोंबरे, राजू सांगावकर, युवासेनेचे चैतन्य देशपांडे, अक्षय घाटगे, कीर्तिकुमार जाधव, रोहित वेढे, प्रथमेश देशिंगे, लतीफ शेख, संकेत गुरव, युवती सेनेच्या राजर्षी मिणचेकर, सानिका दामुगडे, आकाश शिंदे, सुमित मेळवंकी आदी उपस्थित होते.
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.