कोल्हापूर

टेंबलाईवाडी विद्यालय

CD

31046
टेंबलाईवाडी ः येथील टेंबलाईवाडी विद्यालयात झालेल्या क्रीडा महोत्सवावेळी आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर रेश्मा माने यांचा सत्कार करताना मनीषा पांचाळ. शेजारी अनिल माने, विलास पिंगळे.
.....
टेंबलाईवाडी विद्यालयात
क्रीडा महोत्सव उत्साहात

उचगाव, ता. ११ ः टेंबलाईवाडी विद्यालयात नुकताच क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा झाला. आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर रेश्मा माने यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‍घाटन झाले. शिक्षण समिती क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, अनिल माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
रेश्मा माने यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व समजावून सांगितले. कुस्तीत यश मिळवले, पण हा संघर्षमय प्रवास कसा होता, याचा पटही त्यांनी उलगडला. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच आवडत्या खेळामध्ये करियर म्हणून पाहिल्यास पुढे नक्कीच त्या खेळात ते यश मिळवतील, असेही त्यांनी सांगितले. वैयक्तिक प्रकारात धावणे, लिंबू चमचा, पोटॅटो रेस, गोळा फेक आदी तर कबड्डी, खो-खो, लंगडी, रिले आदी सांघिक खेळ यावेळी झाले. केंद्रशाळा मुख्याध्यापक विलास पिंगळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल अकुर्डेकर आदी उपस्थित होते. क्रीडा ज्योतीचे नियोजन प्रभाकर लोखंडे, अशोक गावडे, प्रकाश गावडे यांनी केले. सुशील जाधव यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा पांचाळ यांनी क्रीडा शपथ दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद राहणार

स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात कलाकारांच्या गुरुजनांना मानाचा मुजरा, गुरु-शिष्याची अनोखी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस

Mumbai News: ताडदेवस्थित वेलिंग्डन हाइट्सचे प्रकरण; तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार, कोर्टात काय घडलं?

SCROLL FOR NEXT