श्री. क्षेत्र नृसिंहवाडी दत्त जयंती विशेष ---- ८ कॉलम रंगीत पट्टी
....................
31329
दत्त मंदिरातील श्रींच्या पादुका.
....
31360
नृसिंहवाडी ः दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर येथील श्रींच्या मंदिरातील ब्रह्मवृंदांची चाललेली लगबग.
.....
31331
.....
31330
.........
दिगंबरा दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा...!
............
एंट्रो...
महाराष्ट्रातील प्राचीन धार्मिक तीर्थक्षेत्र व शिरोळ तालुक्यातील काशी म्हणून श्री. क्षेत्र नृसिंहवाडीची ख्याती आहे. नृसिंहवाडी येथे आज(शनिवार) सायंकाळी पाच वाजता दत्त मंदिरात ‘श्रीं’चा जन्मकाळ सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत होत आहे. दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त...!
............
श्री क्षेत्र औदुंबर, गाणगापूर, कुरवपूर आदी दत्त तीर्थक्षेत्रांप्रमाणे येथील दत्त मंदिराचा लौकिक सर्वदूर आहे. डिसेंबरदरम्यान प्रतिवर्षीप्रमाणे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यांसह अनेक भागातून नृसिंहवाडी येथे श्रींच्या दर्शनास भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. सुमारे ६५० वर्षांपूर्वी विजापूरच्या बादशहाच्या कन्येचे अंधत्व ‘श्रीं’च्या कृपाशीर्वादाने नाहीसे झाले. यामुळे तत्कालीन बादशहाने या मंदिराची रचना केली (शके १३४४ ते १३५६). त्यामुळे मंदिरात आजही गलेफासारखी वस्त्रे घालून पूजा बांधली जाते, तर मंदिरासमोरील घाट संत एकनाथांनी बांधल्याचा चरित्रात उल्लेख आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती असे दत्तात्रयांचे अवतार होते. पैकी नृसिंह सरस्वतींचा अवतार लोकोद्वारासाठी झाला. त्यांनी कारंजा, औदुंबर, नृसिंहवाडी येथे वास्तव्य केले. यामुळे नृसिंहवाडी गावाला त्यांच्या नावावरून नृसिंह वाटिका व अपभ्रंशाने नृसिंहवाडी असे नामकरण झाले. कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर निसर्गरम्य सान्निध्यात एक चौरस मैल क्षेत्रामध्ये ‘श्रीं’चे दत्त मंदिर औदुंबर वृक्षाखाली वसले आहे. याला समांतर ५१ पायऱ्यांच्या घाटामुळे मंदिराचे सौंदर्य आणखी खुलले आहे. दत्ताची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील मंदिरात दरवर्षी दत्त जयंती, महाशिवरात्र, गुरुद्वादशी, माघ पौर्णिमा, कृष्णावेणी, नृसिंह जन्मोत्सव आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होता. यावेळी भाविकांची प्रचंड गर्दी होते.
मार्गशीर्ष महिन्यात जन्मकाळ सोहळा आल्याने लाखोंच्या घरात भाविक येतील असा देवस्थान ट्रस्टचा अंदाज आहे. दत्त जन्मकाळ सोहळ्यावेळी म्हणजेच उत्सवादिवशी पहाटे चार वाजता मंदिर परिसरात ब्रह्मवृंदामार्फत भूपाळी, गणपती पूजन, काकड आरतीने दिनक्रमाला सुरुवात होईल. त्यानंतर धान्याष्टक, पुरुषसुक्त, षोडशोपचार पूजाविधी करून त्यानंतर दत्त पादुकांवर कृष्णा नदीचा जलाभिषेक, पंचामृत व फळांचे स्नान होईल. गंध, पुष्प वाहून धूपदीप, नैवेद्य, आरती केली जाईल. यावेळी मूर्तीला केशरयुक्त गंधाचा लेप चढविला जातो. उत्सवमूर्ती व स्वामींची पूजा करून भाविकांना अंगारा व तीर्थ दिले जाते. प्रात:कालच्या पूजाविधीनंतर साडेसात ते बारा या वेळेत भाविकांसाठी अभिषेक करून पंचामृत पूजा, लघुरूद्र विधी केला जातो. दुपारी साडेबारा वाजता महापूजा केल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते.
उत्सवकाळात दुपारी पवमान पंचसुक्त पठण, कीर्तन झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता मुख्य मंदिरातून जन्मकाळ सोहळ्यास ‘दिगंबरा दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा...’च्या गजरात प्रारंभ होईल. यावेळी उत्सवमूर्ती सजविलेल्या पालखीतून नारायण स्वामींच्या मंदिरापासून मुख्य मंदिरात आणण्यात येईल. कीर्तनानंतर ‘श्रीं’चा जन्मकाळ सोहळा ‘दिगंबरा... दिगंबरा...’च्या जयघोषात होईल. जन्मकाळावेळी ‘श्रीं’च्या समोर ब्रह्मवृंदांकडून पाळणा व पाळण्याचे पाळीदार या वर्षाचे मानकरी बाळासाहेब राजोपाध्ये व राजोपाध्ये परिवार (सुयोग्य मंगल कार्यालय) यांच्या घरी भक्तिभावाने नेण्यात येईल. यानंतर मंदिर परिसरात मानकऱ्यांच्या घरी विविध विधी उत्सव संपेपर्यंत सुरू असतात.
दरम्यान, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराची स्वच्छता व रंगरंगोटी दत्त देवस्थानमार्फत करण्यात आलेली आहे. भाविकांसाठी मंदिराच्या दोन्ही बाजूला भव्य दक्षिण-उत्तर शामियाना उभारला आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आबालवृद्धांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी बॅरिकेडची व्यवस्था केली आहे. भाविकांसाठी स्वतंत्र तीन रांगांचे नियोजन केले असून, मंदिरासमोर उंचवटा केला आहे. ध्वनिक्षेपकासाठी दत्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण आहे.
सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही कॅमेरे, क्लोज सर्किट टीव्ही, चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नदीपात्रात लाकडी नावा, रौफ पटेल यांचे वजीर रेस्क्यू फोर्स, व्हाईट आर्मी पथक यांचेही नियोजन केले आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने भाविकांसाठी वीज, पाणी, आरोग्य, स्वच्छता, तात्पुरती पोलिस चौकी, आरोग्य केंद्र व दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे.
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड, मिरज, सांगली, इचलकरंजी एसटी आगारांतर्फे जागा गाड्यांची सोय केली आहे. शक्यतो भाविकांनी दर्शन घेण्यापूर्वी पादत्राणे आपल्या वाहनातच ठेवावीत, असे आवाहन पोलिस प्रशासन केले आहे.
दत्त जयंती उत्सव यशस्वी व्हावा यासाठी सरपंच चित्राताई सुतार, उपसरपंच रमेश मोरे, ग्रामविकास अधिकारी एस. पी. कांबळे, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य धनाजीराव जगदाळे, अनघा पुजारी, अमोल पुजारी, तानाजी निकम, मंगल खोत, पूनम जाधव, चेतन गवळी, विद्या कांबळे आदी सदस्य परिश्रम घेत आहेत. दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव विजय पुजारी, सचिव संजय श्रीपाद पुजारी, संजय नारायण पुजारी, पांडुरंग लक्ष्मण रूक्के- पुजारी, विपुल विनायक हावळे, आनंद अवधूत पुजारी, संतोष रघुनाथ खोंबरे-पुजारी, गजानन दत्तात्रेय गेंडे-पुजारी, सदाशिव रामचंद्र जेरे-पुजारी आदी परिश्रम घेत आहेत.
पुरवणी संकलन
(जितेंद्र आणुजे, नृसिंहवाडी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.