31348
गडहिंग्लज ः शिवराज महाविद्यालयात झालेल्या संशोधन स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद प्रा. किसनराव कुराडे यांच्याहस्ते न्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारले.
.....
न्यू कॉलेजला सर्वसाधारण विजेतेपद
आविष्कार संशोधन स्पर्धा ः गडहिंग्लजच्या ‘शिवराज’मध्ये संयोजन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ ः शिवराज महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद कोल्हापूरच्या न्यू कॉलेजने पटकावले. स्पर्धेत जिल्ह्यातील ३९ महाविद्यालयांतील १९९ विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
विजेत्यांना शिवराजचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे माजी संचालक डॉ. पी. टी. गायकवाड, एन. एस. एस. विद्यार्थी विकास विभागाचे डॉ. टी. एम. चौगले, संचालिका प्रा. बिनादेवी कुराडे, डॉ. आर. एच. अतिग्रे आदींच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. इतर विजेत्यांना बक्षिसे व प्रशस्तिपत्र देऊन गौरविले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी स्वागत केले. समन्वयक डॉ. डी. एच. दगडे, उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे, डॉ. ए. व्ही. धुळे, डॉ. जे. बी. यादव यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी प्रा. कुराडे, डॉ. गायकवाड, डॉ. चौगले, डॉ. अतिग्रे यांची भाषणे झाली. विशाल जाधव अध्यक्षस्थानी होते. स्पर्धा समन्वयक प्रा. सुशांत पांगम, ग्रंथपाल संदीप कुराडे, प्रा. विश्वजित कुराडे, रजिस्ट्रार डॉ. संतोष शहापूरकर व प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी नियोजन केले. डॉ. अशोक मोरमारे, डॉ. श्रद्धा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. गौरव पाटील यांनी आभार मानले.
..
चौकट..
स्पर्धेचा निकाल असा
ह्युमॅनिटी, लँग्वेज आणि फाईन आर्टस्- प्रीती भिसे (इचलकरंजी), श्रुती माने (कोल्हापूर) अवंती पाटील (जयसिंगपूर), कॉमर्स, मॅनेजमेंट व लॉ ः श्रावणी गुरव, रसिका गायकवाड (कोल्हापूर), रामकृष्ण सावंत (वारणानगर), मुस्कान सुतार (इचलकरंजी), आरती नांगरे (सरूड), प्युअर सायन्स ः अनुराधा बोरनाईक (अर्जुननगर), संचिता शिरवळ, स्वरूपा व्हटकर, दिव्या बुधवाणी, प्राची मगदूम (कोल्हापूर), अॅग्रीकल्चर अॅनिमल हजबंडरी ः रितिका कोंडुसकर, विग्नेश पाटील (कोल्हापूर), धनश्री घाटगे (वारणानगर), शिल्पा साळोखे, स्मिता दुकाने (कोल्हापूर), इंजिनिअरिंग व टेक्नोलॉजी ः दीक्षा घोसरवाडे (कोल्हापूर), निखील पाटील (महागाव) श्रुती पाटील, सिद्धार्थ पाटील, सानिया उर्फ रसिका शिंदे (कोल्हापूर), मेडिसीन आणि फार्मसी ः श्रुती किल्लेदार, स्वप्नाली माने, आफताब गडकरी कोल्हापूर, सायली कागले (कोल्हापूर).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.