पूरमुक्त कोल्हापूर मालिका लोगो आज प्रसिद्ध टुडे १ अँकरमधून
भाग - २
नदीकाठच्या तांबड्या मातीची
व्यावसायिक कारणासाठी लूट
नद्या झाल्या उथळ; अधिकारी अजूनही सुस्त
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : नद्यांमध्ये प्रचंड गाळ साचला आहे. नदीकाठावरील तांबड्या मातीची मोठ-मोठी तटबंदी व्यावसायिक कारणासाठी वापरली जात आहे. विटा तयार करण्यासाठी याच मातीचा सर्रास वापर होत आहे. वाळू उपसा होत नाही. यामुळे उथळ झालेल्या नदीपात्रातील पाणी पहिल्या पावसात पात्राबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत जिल्ह्यातील सरासरी पावसाचे प्रमाणही वाढले आहे. याचा परिणाम म्हणून बघता-बघता नदीपात्रातील पुराचे पाणी नागरीवस्तीमध्ये शिरून नुकसानीला कारणीभूत ठरत आहे. याचा रितसर अभ्यास करण्याची जबाबदारी प्रशासन, पाटबंधारे विभागावर असतानाही अधिकारी अजूनही सुस्त बसले आहेत.
जिल्ह्यात दहा ते पंधरा वर्षांत नदीकाठावरील मातीचा मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे. तांबड्या मातीचे डोंगरच्या डोंगर वीट निर्मितीसाठी वापरले जात आहेत. कायदेशीर आणि फायदेशीर अशा दोन्ही पद्धतीने माती उपसाचे परवाने दिले जातात. पूर येणार म्हणून दक्षता बाळगा म्हणणारे महसूल विभागाचे अधिकारी इतरवेळी नदीकाठची माती उपसा रोखण्यात मात्र डोळेझाक करताना दिसत आहेत. भोगावती, पंचगंगा, कुंभी, तुळशी, कासारीसह इतर सर्वच नदीकाठांवर हीच वस्तुस्थिती आहे. कवडीमोलाने विक्री होणारी हीच माती पुरापासून गावाचे रक्षण करते, याचाच लोकांना विसर पडला आहे. त्याला प्रशासनातील अधिकाऱ्यांचेही पाठबळ असल्याचे दिसून येते.
दिवसभर विश्रांती आणि रात्रभर नदीकाठ लुटला जात आहे.
गाळ, वाळू उपसा थांबला
शासनाने रितसर परवानगी घेऊन वाळू उपसा करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, वाळू उपसा अद्याप सुरू झालेला नाही. नदीतील गाळ काढून नदीपात्र खोल आणि रुंद करण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. याला गती मिळायला हवी. कोल्हापुरला पुराने वेढा घातल्यानंतर गाळ काढण्याची चर्चा जोरात होते. पूर ओसरल्यानंतर या चर्चाही हवेत विरून जातात.
जिल्ह्यात कमी वेळेत जास्त पाऊस
जिल्ह्यात कमी वेळेत जास्त पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील महापुराच्या मुख्य कारणांपैकी हे एक महत्त्वाचे कारण आहे. २०१९ आणि २०२१ मध्ये आलेल्या पुराचे हे एकमेव कारण होते. अतिवृष्टीमुळे अवघ्या २६ दिवसांत राधानगरी धरण तर भरलेच पण इतर धरणांमधील पाणीसाठा ८५ टक्के ते ९० टक्क्यांपर्यंत वाढला. धरणातील पाणी शहरापर्यंत किंवा नदीकाठच्या गावांपर्यंत येण्याआधीच ओढे आणि नाल्यांमधून आलेल्या पाण्यामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यात ९०० हून अधिक तर शहरात दहाहून अधिक नाले आहेत. हे नाले सध्या शोधावे लागत आहेत. याच नाल्यांवर मोठ-मोठ्या इमारती उभाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे पाणी शहरातूनच नदीकडे जात आहे.
...
चार्ट करावा
जिल्ह्यातील पाच वर्षांमधील सरासरी पाऊस
२०२० - १४०६
२०२१ - १४७५
२०२२ - १३४५
२०२३ - ९८०
२०२४ - १४८५
चौकट
जिल्ह्यात पाच वर्षांत पडझडीने झालेले नुकसान
वर्ष*नुकसानीची संख्या
२०२०*७६५
२०२१*२५३०
२०२२*९५०
२०२३*५०२
२०२४*४१९०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.