कोल्हापूर

विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय पुण्याला नेण्याच्या हालचाली

CD

विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय
पुणे येथे नेण्याच्या हालचाली

विभागीय आयुक्तांना प्रस्ताव; गुन्ह्यांचे प्रमाण घटल्याचे कारण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण व पुणे ग्रामीण या परिक्षेत्रासाठी असलेले विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय पुणे येथे नेण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर गतिमान झाल्या आहेत. याबाबतचा प्रस्ताव नव्याने पुणे विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न सध्या दिसत नसून, गुन्हेगारीचे प्रमाणही कमी आल्याचे कारण पुढे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजला जातो. तसेच महाराष्ट्र व कर्नाटक सीमावादाचा प्रश्न असल्याने १९७२ साली विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय कोल्हापुरात आणण्यात आले होते. यानंतरच याचे नामकरण कोल्हापूर परिक्षेत्र करण्यात आले होते. मात्र, मागील दोन वर्षांत हे कार्यालय पुणे येथे हलविण्यासाठी वारंवार हालचाली सुरू आहेत. महसुली विभागीय आयुक्त कार्यालयांसह सर्व शासकीय कार्यालये पुण्यात असल्याचे कारण पुढे करत विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयही पुण्यात असावे असा ‘अट्टाहास’ सध्या सुरू आहे.

सीमाप्रश्‍न नसल्याचे दिले कारण
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीचे वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. कोल्हापूरच्या सीमा कर्नाटक, गोवा राज्यांना लागून असल्याने येथील मद्य, गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसते. असे असतानाही कोल्हापूर, सांगली, सातारच्या तुलनेत पुणे व सोलापूर ग्रामीणमध्ये गुन्हेगारी अधिक असल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. या कारणासह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नही सध्या नसल्याचे भासवून स्थलांतरणाचा प्रस्ताव वारंवार पाठविण्यामागील नेमके कारण समजून येत नाही.

००००

निवासी फुटबॉल केंद्र, ‘एमटीडीसी’ आधीच गेले
निवासी फुटबॉल केंद्र १९९६ मध्ये कोल्हापुरात होते. ते बंद करून पुणे क्रीडा प्रबोधिनीमध्ये समाविष्ठ करण्यात आल्याने कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाडूंची उपेक्षा झाली; तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय २०१४ मध्ये रत्नागिरीला नेण्यात आले. सध्या कोल्हापूरचा सहभाग पुणे विभागात असल्याने कोल्हापुरात पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न दिसत नाहीत. अशीच अवस्था भविष्यात विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाबाबत होण्याचीही भीती आहे.
........................

कोल्हापुरातील विशेष पोलिस महानिरीक्षक मुख्य कार्यालय पुण्यात हलवण्याच्या हालचाली खऱ्या असतील; तर हा सरकार बदलाचा परिणाम म्हणता येईल. कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या, व्यापारीदृष्ट्या असलेले महत्त्व, कर्नाटक, गोवा यांची सीमा पाहता हे कार्यालय कोल्हापुरात असणे गरजेचे आहे.
- आमदार सतेज पाटील, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT