कोल्हापूर

म्युझिक लव्हर्स ग्रुप वर्धापनदिन

CD

31460

जिना यहॉं, मरना यहॉं...
‘म्युझिक लव्हर्स’ग्रुपतर्फे राज कपूर यांना अभिवादन

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १३ ः विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या व्यक्तींचा सन्मान सोहळा आणि द ग्रेट शो मॅन राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या गाण्यांनी सजलेल्या कार्यक्रमाने म्युझिक लव्हर्स ग्रुपचा तिसरा वर्धापनदिन सोहळा झाला. देवल क्लबमध्ये रंगलेल्या या सांगीतिक कार्यक्रमात ग्रुपच्या सदस्यांनी राज कपूर यांच्यावर चित्रित झालेली गाणी गात त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
ज्येष्ठ अभिनेते डॉ. शरद भुताडिया यांच्या हस्ते अभिनेते भरत दैनी, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते सागर बगाडे, ऐतिहासिक कला जपणारे संदीप सावंत यांचा सन्मान करण्यात आला.
सन्मान सोहळ्यानंतर ‘दिल का हाल सुने दिलवाला’ हे गीत गात महावीर तीपन्नवर यांनी सांगीतिक कार्यक्रमाला सुरूवात केली. यानंतर ‘सजन रे झूठ मत बोलो’, ‘ओ बसंती पवन पागल’, ‘बोल राधा बोल संगम होगा के नहीं’, ‘पान खायो सय्या’, ‘भवरे कि गुंजन’, ‘ए भाई जरा देख के चलो’, ‘मैं हुं प्रेमरोगी’ अशी गीते सादर झाली. आशुतोष साळोखे, जास्वंदी कुलकर्णी, सुरेश कांदेकर, मोनिका बकरे, शेखर तिवले, संजीव पाटील, शिरीष पाटील, प्रियंका वालावलकर, श्रद्धा गुळवणी, उमेश साळोखे, डॉ. संदीप पाटील व धनश्री नाझरे यांनी गीते गायली. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू राकेशकुमार मुदगल, राजेंद्र बुगडे उपस्थित होते.

चौकट
लक्षवेधी सादरीकरण
डॉ. संदीप पाटील यांनी मैफलीत ‘जिना यहॉं मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ'' हे गीत सादर केले. त्यासाठी त्यांनी खास जोकरची हुबेहूब वेशभूषा केली. त्यांचे हे सादरीकरण लक्षवेधी ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

India Captain: संजू सॅमसन होणार भारतीय संघाचा कर्णधार? सूर्यकुमार यादवनंतर T20 तील नेतृत्वाबाबत चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दहावीचे गणिताचे पेपर फुटले, टेलिग्राम ग्रुपच्या Adminवर गुन्हा दाखल

आता बसचे स्टिअरिंग महिला चालकांच्या हाती! सक्षमीकरणाचा प्रशासनाचा ऐतिहासिक निर्णय; ४०० महिलांची भरती होणार, कुठे अन् कधी?

अर्शदीप सिंगने 'माफी' मागायला नको हवी होती, तू देशाचे प्रतिनिधित्व करतोस; गौतम गंभीरचं रोखठोक मत, वन डे वर्ल्ड कपचा प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT