कोल्हापूर

भविष्य निधीतर्फे कॅम्पचे आयोजन

CD

भविष्य निर्वाह
निधी कार्यालयातर्फे
कॅम्पचे आयोजन

कोल्हापूर : कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ई.पी.एफ.ओ.) कोल्हापूर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील सदस्यांना ‘यूएन’ सक्रिय करण्यासाठी उद्यापर्यंत (ता. १४) कॅम्पचे आयोजन केले आहे. या अंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमधील संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे युनिव्हर्सल अकाऊंट नंबर सक्रिय कारण्यासाठी कराड तासवाडे एमआयडीसी, कऱ्हाड, सातारा ॲडिशनल एमआयडीसी, शिरवळ एमआयडीसी विभाग, कवठेमहाकाळ नगरपरिषद, सांगली, मेनन अंड मेनन, (कोल्हापूर) या ठिकाणी कॅम्प होत आहेत. तरी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घावा, असे आवाहन आयुक्त अमित चौगुले यांनी पत्रकाद्वारे केले.
...
जिल्हा फोर व्हिलर
वर्कशॉपतर्फे
नृसिंहवाडीत सेवा
कोल्हापूर : ओम ग्रुप संचलित कोल्हापूर जिल्हा फोर व्हिलर वर्कशॉप ओनर वेलफेअर असोसिएशन आणि रिसर्च फाउंडेशनतर्फे या वर्षीपासून नृसिंहवाडी येथील दत्त जयंती उत्सवानिमित्त येणाऱ्या भाविकांच्या फोर व्हिलर बंद पडल्यास आमची संस्था मोफत सेवा देण्यासाठी तत्पर राहील. ही सेवा शनिवारी (ता. १४) सकाळी आठ ते सायंकाळी आठपर्यंत असेल. ही सेवा नृसिंहवाडी फोर व्हिलर पार्कींग व्यवस्था या ठिकाणी राहील, अशी माहिती अध्यक्ष योगेश पाटील, नृसिंहवाडी टिमचे बजरंग खिरुगडे, महेश कोरे, सचिव बाहुबली खोत, सदस्य विनायक मांजरेकर यांनी दिली.
...
‘हर्षवर्धन’तर्फे
दत्त जयंती उत्सव

कोल्हापूर : जी. के. जी. कॉलेज, हुतात्मा गार्डन समोर हर्षवर्धन सामाजिक कल्याण संस्थेतर्फे दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे. उद्या (ता. १४) दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व भक्तानी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष रणजित औंधकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

पोयरी हलु हलु नाच… ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर viral video

Latest Marathi Live Update: आसाम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा आज

Latur Police Bharti: लातूरमध्ये पोलिस शिपाई भरतीची आज लेखी परीक्षा; ३२८ उमेदवार सज्ज

Unseasonal Rain: राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली; १७ ते २० मार्चदरम्यान पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT