लोगो ः सीपीआर
खासगी लॅबकडून रक्त नमुने
संकलीतप्रकरणी चौकशी करा
वैद्यकीय अधिक्षकांना संभाजी ब्रिगेडचे निवेदन
कोल्हापूर, ता.७ ः छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात सीपीआरतील रुग्णांचे रक्त तपासणीसाठी नमुने खासगी लॅबकडे पाठवले जातात. त्यासाठी खासगी लॅबचे प्रतिनिधी सीपीआर आवारातून बेकायदेशीरपणे रक्त नमुणे संकलीत करतात असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या रूपेश पाटील यांनी केला होता, त्याबाबत आज दुसऱ्या दिवशीही वैद्यकीय अधिक्षकांना त्यांनी निवेदन दिले.
निवेदनातील माहिती अशी सरकारी रुग्णालये गरजू घटकांना उपचार सेवेसाठी महत्वाची आहेत. मात्र येथील सीपीआर रुग्णालयात खासगी लॅब प्रतिनिधी व काही डॉक्टर यांच्या संगनमतातून रुग्णांचे आर्थिक शोषण होत आहे. सामान्य लोकांना शासकीय सुविधेचा लाभ सहजपणे मिळणार नाही अशी यंत्रणाच येथे उभी असल्याचे दिसते. त्यामुळे रुग्णसेवेवरील विश्वासाला तडा पोहचत आहे. अशा काही बाबी येथे निदर्शनास येत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
संभाजी ब्रिगेडने केलेल्या मागण्या
सीपीआरमधील रुग्णांचे नमुणे खासगी लॅबला बेकायेदशीरपणे देण्यात जे घटक सहभागी असतील त्यांची नावे व त्याचा लाभ घेतलेली रक्कम जाहीर करावी. आरोग्य सेवा पारदर्शक व सक्षम करावी. ज्या रक्त चाचण्या सीपीआरमध्ये होत नाही अशा चाचण्या करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या हिंद लॅब येथून करून घेण्याचा पर्याय द्यावा. तक्रारीसाठी सक्षम अधिकाऱ्यांचे पद व मोबाईल क्रमांक असलेला फलक लावा.
कोट
सीपीआर आवारातून बेकायदेशीरपणे रक्ताचे नमुणे संकलीत करून खासगी लॅबकडे तपासणीसाठी पाठवले जात आहेत, अशा आशयाची तक्रार आली आहे. या अनुशंगाने चौकशी करावी, असे पत्र पोलिसांना दिले आहे. कोणत्या रक्त नमुण्याची तपासणी सीपीआरमध्ये होते. कोणत्या मोजक्या चाचण्या बाहेरून करून घ्याव्या लागतात याचीही पडताळी करू. रक्त तपासणीची सुविधा सक्षम करण्यात येईल.
-डॉ. शिशीर मिरंगुडे वैद्यकीय अधिक्षक सीपीआर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.