37028
पद्माराजे उद्यानासमोर फुटलेल्या
ड्रेनेज झाकणाकडे दुर्लक्ष
कोल्हापूर, ता. ७ ः शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानासमोरील रस्त्याची साडेसाती संपत नसलेली दिसते. वर्दळीच्या रस्त्यावरील ड्रेनेजचे झाकण तुटले आहे. तिथे नवीन झाकण लावण्याऐवजी बॅरिकेड्स लावून ठेवली आहेत.
शिवाजी पेठेतील रंकाळ्याच्या बाजूकडील अनेक नागरिकांना पद्माराजे उद्यान विरंगुळ्याचे ठिकाण आहे. तिथे असलेली वृक्षसंपदा मोठी आहे. तेथील स्वच्छतेबाबत स्थानिक नागरिक सतर्क आहेत. हे उद्यान चांगले बनवण्याचे प्रयत्न सुरू असताना आजूबाजूच्या रस्त्यावर मात्र दुरवस्था सुरू झाली आहे. रंकाळ्याच्या बाजूकडील रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे. तिथे पर्यटकांचीही संख्या मोठी असते. या रस्त्यावर ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार होत होते. काही दिवसांपासून ते बंद झाले आहेत. पण तिथे असलेल्या ड्रेनेजच्या चेंबरचे झाकण फुटले आहे. ते धोकादायक झाल्याची तक्रार महापालिकेकडे केल्यानंतर झाकण बदलणे अपेक्षित होते. उलट तिथे बॅरिकेड्स लावून तसेच ठेवले आहे. रात्री ते लक्षात न आल्याने अपघात होण्याचा धोका आहे. त्यामुळे तातडीने झाकण बदलण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.