सीसीटीव्हीऐवजी बोर्डाने
यंत्रणा सक्षम करावी
‘विद्यार्थी-पालक प्रवेश हक्क’ची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : दहावी, बारावी परीक्षेतील कॉपीचे प्रकार थांबविण्यासाठी बोर्डाने शाळांना सीसीटीव्ही लावण्याची सूचना करण्याऐवजी स्वतःची यंत्रणा सक्षम करावी, अशी मागणी युवक विद्यार्थी-पालक प्रवेश हक्क व संरक्षण संघटनेने केले. त्याबाबतचे निवेदन बोर्डाचे कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगुले यांना दिले.
बोर्डाच्या विभागीय अध्यक्षांनी केलेली सूचना ही योग्य आणि चांगली आहे; परंतु या सीसीटीव्ही बसविण्याचा खर्च कोणी करावयाचा, हा मोठा प्रश्न आहे. संस्थाचालकांची परिस्थिती चांगली नाही. कारण शिक्षकेतर अनुदान सध्या बंद आहे. त्यामुळे सीसीटीव्ही लावण्याबाबत शाळांना सूचना करण्याऐवजी कॉपीसारखे प्रकार रोखण्यासाठी बोर्डाने स्वतःची यंत्रणा सक्षम करावी. ज्या शाळेत कॉपीसारखे प्रकार सापडतील त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली. संघटनेचे सचिव फिरोज सरगूर, कार्याध्यक्ष अविनाश माने, राजू थोरवडे, सुभाष घाटगे, पप्पू जाधव, सोनी चव्हाण, सलीम शेख, नागेश शिंदे, गौरव पवार, राज पवार, साजिद गडवाले, आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.