37097
चंद्रकांत सांगावकर यांचे निधन
कोल्हापूर ः महापालिकेचे माजी उपमहापौर व वीरशैव बॅंकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत सदाशिव सांगावकर (वय ८३) यांचे निधन झाले. ते काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. महापालिकेजवळील बाजारगेट परिसरातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मिरची व्यापारी म्हणूनही ते प्रसिद्ध होते. १९९५ मध्ये नगरसेवक झाल्यानंतर लगेचच उपमहापौर झाले. परिसरातील तालीम संस्थांमध्येही ते सक्रिय होते.
37060
अंजना पोवार
कोल्हापूर : मिरबाग येथील अंजना रंगराव पोवार यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे.
37062
सचिन शिंदे
कोल्हापूर : खंडोबा तालीम, शिवाजी पेठ येथील सचिन कृष्णात शिंदे (वय ३९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, भाऊ, चुलते असा परिवार आहे.
37064
सरस्वती कदम
कोल्हापूर : राजारामपुरी सहावी गल्ली येथील सरस्वती ज्ञानदेव कदम (वय ९६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, नातवंडे व परतवंडे असा परिवार आहे. वृत्तपत्र विक्रेता हर्षदा कदम यांच्या आजी तर माजी नगरसेवक अनिल कदम यांचा त्या आई होत.
37066
नरेंद्र पंडत
कोल्हापूर : संभाजीनगर, पाडळकर वसाहत येथील नरेंद्र सिलेमान पंडत यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे.
37074
हारुबाई भाले
कोल्हापूर : पाचगाव येथील हारुबाई मारुती भाले (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे व परतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ९) आहे.
11117
बाळासाहेब पाटील
घुणकी : चावरे (ता. हातकणंगले) येथील बाळासाहेब यशवंत पाटील (वय.७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) जुने चावरेत आहे.
01304
डॉ. दत्तात्रय पाटील
प्रयाग चिखली ः येथील डॉ. दत्तात्रय बाबूराव पाटील (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ९) क्षेत्र प्रयागला आहे.
2052
बाजीराव घोरपडे
शिरोळ ः येथील बाजीराव श्रीपती घोरपडे (वय ६३) यांचे निधन झाले. ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी व्यवस्थापक होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व विवाहित मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे.
GAD75.JPG
37079
बाबू संकपाळ
गडहिंग्लज ः मासेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील बाबू गुंडू संकपाळ (९४) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जनबुधवारी (ता. ८) आहे. हेब्बाळ जलद्याळमधील दै. ‘सकाळ’चे एजंट शिवाजी पाटील यांचे ते सासरे होत.
05321
लीलाबाई गुरव
पुनाळ : पुशिरे तर्फ बोरगाव (ता.पन्हाळा) येथील लीलाबाई सदाशिव गुरव यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे.
05494
पुष्पावती कांबळे
राधानगरी : येथील पुष्पावती शंकरराव कांबळे (वय ७३) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे. त्यांच्या मागे दोन मुलगे, विवाहित दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
02197
मालूबाई पाटील
वडणगे : येथील मालूबाई यशवंत पाटील (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगे, मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविर्जन बुधवारी (ता. ८) आहे.
09776
रूपाली उपाध्ये
जयसिंगपूर : तिसऱ्या गल्लीतील रूपाली बापूसाहेब उपाध्ये (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, विवाहित मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे.
05982
प्रमिलादेवी माने
कुडित्रे : सर्वेश पार्क, फुलेवाडी येथील प्रमिलादेवी नामदेव माने (वय ८०) यांचे निधन झाले.त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) आहे.
37123
दीपक माने
कोल्हापूर ः उचगाव येथील दीपक मनोहर माने (मूळ रा. निपाणी) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) पंचगंगा स्मशानभूमीत आहे.
04986
भालचंद्र कागले
कुरुंदवाड ः येथील भालचंद्र आण्णू कागले (वय ७४) यांचे निधन झाले. शिरोळ पंचायत समितीचे ते माजी सभापती होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. माती सावडणे विधी गुरुवारी (ता. ९) आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.