इचलकरंजी महापालिका उपायुक्तांच्या
मोटारला ट्रॅक्टर-ट्रॉलीने दिली धडक
इचलकरंजी, ता. ७ ः इचलकरंजी महापालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या मोटारीला ट्रॅक्टर-ट्रॅालीने धडक दिली. यामध्ये ते थोडक्यात बचावले. त्यांना शारीरिक इजा झाली नाही, मात्र त्यांचा चालक किरकोळ जखमी झाला. स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आज दुपारी तीन वाजता हा अपघात झाला. यामध्ये उपायुक्त काटकर यांच्या मोटारीच्या चालकाकडील बाजूचे मोठे नुकसान झाले असून, अपघातस्थळी काचांचा खच पडला होता.
उपायुक्त काटकर हे आज महापालिका कामकाजाबाबत एका ठिकाणी बैठकीला गेले होते. तेथील बैठक आटोपून ते स्टेशन रोडमार्गे महापालिका कार्यालयाकडे परतत होते. डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ आले असता चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रॅक्टर-ट्रॅालीने चालकाच्या दरवाजाच्या बाजूला जोरात धडक दिली. केएटीपी मैदानातील साहित्य भरून ट्रॅक्टर-ट्रॅाली इंडस्ट्रियल इस्टेटकडे जात होती. सुदैवाने दोन्ही वाहनांचा वेग मर्यादित होता. वाहतुकीची मोठी वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ ठळला. अपघातानंतर भीतीने ट्रॅक्टरचालक पळून गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.