कास्ट्राईब महासंघ कार्यालयास
विभागीय सहसंचालकांची भेट
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः उच्च शिक्षण विभागीय सहसंचालक डॉ. धनराज नाकाडे यांनी राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या शिवाजी विद्यापीठातील कार्यालयास आज सदिच्छा भेट दिली. त्यांनी यावेळी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय बिले, वेतन निश्चिती आदींबाबतचे प्रश्न जाणून घेतले. ते सोडविण्याबाबत सकारात्मक कार्यवाहीची ग्वाही दिली.
महासंघाचे अतिरिक्त महासचिव आनंदराव खामकर यांनी डॉ. नाकाडे यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले. उच्च शिक्षण विभागातर्फे झिरो पेंडन्सी धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. सद्यस्थितीत प्रलंबित सर्व प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. काही प्रश्न प्रलंबित असल्यास सत्वर या कार्यालयाशी संघटनेच्या माध्यमातून संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. नाकाडे यांनी केले.
विद्यापीठ आजी- माजी विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण कोडोलीकर यांना धम्मविचार साहित्य गौरव पुरस्काराने गौरवण्यात आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. खामकर यांनी संवेदनशील, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी संघटना खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही दिली. उदय पवार, दिनेश उथळे, सुनीता वांगीकर, बाबासाहेब कांबळे, प्रकाश श्रावस्ती, कमलाकर जाधव, दीपक शिंदे, विठ्ठल लोखंडे, सागर लांडे, शिवाजी शेळके, कुमार शिंदे, सुजित मुंडे, जीवन प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.