Crime News sakal
कोल्हापूर

Kolhapur : मोक्कातील आरोपी तुरुंगातून सुटले, मिरवणुकीनंतर दुधाने अंघोळ, स्वागताला फुलांच्या रांगोळ्या

Kolhapur : जामीन मिळाल्याने कळंबा कारागृहापासून त्याची मिरवणूक काढल्याप्रकरणी सात जणांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ७ : मोका गुन्ह्यातील संशयिताला जामीन मिळाल्याने कळंबा कारागृहापासून त्याची मिरवणूक काढल्याप्रकरणी सात जणांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. २४ डिसेंबरला काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होताच ही कारवाई झाली. मिरवणुकीसाठी वापरलेली मोटार, दोन मोपेडही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.

याप्रकरणी मोकातील संशयित अनिकेत अमर सूर्यवंशी (वय २३), गब्बर ऊर्फ आदित्य अमर सूर्यवंशी (२५, दोघे रा. केव्हीज पार्क, नागाळा पार्क), अनुराग दिलीप राखपसारे (२०), करण ऊर्फ तुषार सिद्धू कुमठे (२२), प्रथमेश कुमार समुद्रे (२०, तिघे रा. सदर बाजार), सागर कैलाश गौडदाब (३४, कदमवाडी) व वेदांग शिवराज पोवार (३०, रा. बिंदू चौक) अशा सात जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली, तर आणखीन ५ संशयितांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संशयित अनिकेत सूर्यवंशी व आदित्य सूर्यवंशी हे मोकामधील आरोपी आहेत. दोघांची रवानगी कळंबा कारागृहामध्ये करण्यात आली होती. २४ डिसेंबरला या दोघांना जामीन मिळाल्याने काही साथीदार त्यांना आणण्यासाठी गेले होते. दोघे बाहेर आल्यानंतर एका मोटारीत बसवून त्यापाठीमागे काही दुचाकींचा ताफा घेत कळंबा कारागृहापासून मिरवणूक काढली.

नागाळा पार्कमधील सूर्यवंशी टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई झाली होती. २०२१ पासून टोळीला शिक्षा देण्यात आली होती. यातील आदित्य सूर्यवंशीची वर्षभरापूर्वी सुटका झाली. तर अनिकेत सूर्यवंशीची २४ डिसेंबरला सुटका झाली. सुटकेनंतर अनिकेतची मिरवणूक काढली. तर दारात मंडप घालून दुधाने अंघोळ घालण्यात आली. फुलांच्या रांगोळ्याही काढल्या होत्या.

नागाळा पार्कापर्यंत टोळक्याने जल्लोष केल्याचे रिल्स बनवून ते सोशल मीडियावरील ‘आर. एस. कंपनी १२५’ या अकाऊंटवर व्हायरल केले होते. ६ जानेवारीला हे रिल्स पाहून पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी डी. बी. पथकाच्या पोलिसांना संशयितांचा शोध घेण्यास सांगितले होते. यावरून मुख्य संशयित अनिकेत सूर्यवंशीला ताब्यात घेत अन्य साथीदारांची नावे निष्पन्न करण्यात आली. कारवाईत सहायक फौजदार संदीप जाधव, मिलींद बांगर, महेश पाटील, विकास चौगले, रवी आंबेकर, सनिराज पाटील, बाबा ढाकणे, सुशील गायकवाड यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

मी सगळं सोडूनच गेलेलं... लग्नानंतर अभिनय करणार नव्हती मृणाल दुसानिस; बाळ झाल्यानंतर का बदलला निर्णय?

Latest Marathi Update Live: कांदा खरेदीत नवा पेच; परवान्याअभावी शेतकऱ्यांसमोर अडचणींचे सावट

SCROLL FOR NEXT