‘शासकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे’
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ,ता. ७ ः शासकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे, अभियांत्रिकी महाविद्यालय पदनिर्मिती शासन निर्णय अध्यादेशात अंशतः बदल व्हावा आदी मागण्यांचे निवेदन तंत्रनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे चिटणीस अनिल लवेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाने निवेदन दिले.
निवेदनातील माहिती अशी, सरकारी कर्मचारी नियमाला बांधील आहे. तो नियमानुसार कामकाज करीत असतो. अशा वेळी कोणी बेकायदा काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील पद निर्मितीच्या आदेशात तांत्रिक तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी पद बाह्यस्त्रोतांमधून उपलब्ध करून घ्यावीत, असे नमूद केले आहे. यातून कंत्राटीकरणाला प्राधान्य दिल्याचे दिसते. त्यामुळे आदेशात बदलकरून तांत्रिक व सहाय्यकारी पदे नियमीत स्वरूपात भरावीत, अशी मागणी अभियांत्रिकी कर्मचारी संघटनेचे नेते दत्ता सुतार यांनी केली. यावेळी संघटना अध्यक्ष दिलीप शिंदे, कार्याध्यक्ष विजय माणगावकर, सतीश काळे, परशुराम चव्हाण, गणेश खोचरे, अभिजीत पाटील, ज्योती नीळकंठ, पूनम गुरव, वसंत डावरे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.