कोल्हापूर

gad712.txt

CD

गडहिंग्लजला भरवस्तीत
डांबराला लागली आग

गडहिंग्लज, ता. ७ ः रस्ताकामासाठी लागणारे डांबर पातळ करण्यासाठी लावलेल्या आगीमुळे तापमान वाढून डांबराच्या भट्टीलाच आग लागण्याची घटना शहरातील लक्ष्मी मंदिराजवळ घडली. पालिकेचे अग्निशमन दल वेळेत पोहचल्याने केवळ दैव बलवत्तर म्हणूनच मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा उपस्थितात होती. सायंकाळी पाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेने काही वेळ भीतीचे वातावरण तयार झाले.
शहरातील नेहरू चौक परिसरातील रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू आहे. डांबर पातळ करण्यासाठी भट्टी सुरू होती. खालून लाकडाची जाळ सुरूच राहिल्याने भट्टीचे तापमान वाढले. धूराचे लोट बाहेर पडू लागले. तेवढ्यात डांबराने पेट घेतला आणि आग लागली. या घटनेची माहिती मिळताच पालिका अग्निशमन दलाचे लिडींग फायरमन महादेव बारामती, वाहनचालक सुरज सावेकर, फायरमन अक्षय पालकर, मदतनीस राहूल कारंडे, गजानन कुंभार यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहचले. पहिल्यांदा पेटलेल्या लाकडांची आग विझविली. त्यानंतर डांबर भट्टीवर एबीसी टाईप फायर एक्सटिंग्युशरचा वापर केला. तरीही आग भडकत राहिल्याने फोम कपांऊडचा वापर करून आग अटोक्यात आणण्यात या पथकाला यश आले.
दरम्यान, मुळात हा परिसर मोठ्या वर्दळीचा. तेथेच महालक्ष्मी मंदिर आहे. मंगळवार असल्याने दर्शनासाठी नागरिकांची रहदारी अधिक असते. त्याच रस्त्यावर भाजीविक्रेते बसलेले असतात. दुकानेही आहेत. खरेदीसाठी ग्राहक या परिसरात मोठ्या प्रमाणात असतात. सायंकाळच्या वेळी तर हा रस्ता नागरिकांनी गजबजलेला असतो. डांबराच्या भट्टीतून धुराचे लोट बाहेर पडताच नागरिक भितीने सैरावैरा धावू लागले. कोणाला काहीच समजेना झाले. काही वेळाने डांबराने पेट घेतला. त्यामुळे भीतीमध्ये अधिक भर पडली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT