37096
कोल्हापूर : लोककल्याण फाउंडेशनतर्फे आयोजित ‘खेळ आणि कायदा’ व्याख्यानात बोलताना पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे. सोबत राहुल इंगवले, संजय कुराडे, सुहास साळोखे, अजित खराडे, चंद्रकांत यादव, विजय साळोखे आदी.
..................
मुलांना पराभवही पचवायला शिकवा
संजीवकुमार झाडे ः खेळ आणि कायदा व्याख्यान उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः ‘परीक्षेत गुण कमी पडले म्हणून काही मुले आत्महत्या करतात. त्यांना पराभवही पचवायला शिकवा. पराभव पचविण्याचे शिक्षण खेळातून मिळते,’ असे प्रतिपादन जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी केले. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात लोककल्याण फाउंडेशनतर्फे आयोजित ‘खेळ आणि कायदा’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
झाडे म्हणाले, ‘अनेक वेळा एखाद्या साध्या परीक्षेत गुण कमी मिळाले म्हणून आत्महत्या करणारी मुले दिसतात. याचे कारण पालकांनी त्यांना पराभव पचवायला शिकवलेले नसते. म्हणून आपल्या मुलाला पराभवही पचवायला शिकवा. हे शिक्षण केवळ खेळातून मिळते. खेळामुळे शरीर, मन तंदुरुस्त राहते. खेळाडू पराभव आणि जीत शांतपणे स्वीकारायला शिकतात. जीवनात त्यांना या गुणाचा मोठा उपयोग होतो. कोल्हापूरकर खेळाला प्रोत्साहन देतात. २० हजार तिकिटे काढून फुटबॉल पाहण्यास येणारी मंडळी येथेच पाहायला मिळतात, ही कौतुकास्पद बाब आहे; पण काही हुल्लडबाज प्रेक्षकांमुळे कोल्हापूरच्या फुटबॉलला गालबोट लागते. त्यातून तरुण गुन्ह्यात अडकतो. त्यांचे करियर उद्ध्वस्त होण्याची शक्यता अधिक असते. पोलिस भरतीत खेळात केलेल्या गुन्ह्यामुळे नेमणूक प्रलंबित ठेवली जाते, अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे खेळ खिलाडूवृत्तीने खेळा.’
कार्यक्रमादरम्यान वयाच्या पंच्याहत्तरीतही मैदानात उतरणारे ज्येष्ठ फुटबॉलपटू बाबूराव घाटगे यांचा विशेष गौरव करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास साळोखे यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ नेते चंद्रकांत यादव यांनी आभार केले. यावेळी चंद्रकांत सूर्यवंशी, जगन्नाथ सूर्यवंशी, निवृत्त पोलिस अधिकारी रवींद्र साळुंके, अनिल चव्हाण, शाहीर राजू राऊत, राहुल जरग, सुहास मिठारी, प्रकाश मिसाळ, प्रकाश राऊत, राजेंद्र खदरे, जयंत मिठारी, विकास जाधव, कमलाकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.