एमबीए
प्रवेश परीक्षेची
प्रक्रिया सुरू
कोल्हापूर ः एमबीए आणि एमसीएच्या प्रवेशासाठी डीटीईची प्रवेश परीक्षा द्यावी लागते. एमबीए आणि एमसीए प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जानेवारी असल्याची माहिती शिवाजी युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बापूसाहेब सावंत आणि उपाध्यक्षा डॉ. स्वेता मेथा यांनी दिली. यावर्षीची एमबीए प्रवेश परीक्षा १, २, ३ एप्रिल, तर एमसीएची प्रवेश परीक्षा २३ मार्चला होणार आहे. या परीक्षेसाठीचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत २५ जानेवारी आहे, तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रवेश परीक्षेचे अर्ज (www.mahacet.org) या वेबसाईटवर जाऊन भरावेत. कारण, या प्रवेश परीक्षा दिल्या तरच शासनाकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या सवलतींसाठी विद्यार्थी पात्र ठरतात. या परीक्षेमुळे फीमध्ये मिळणाऱ्या सवलती मिळणार आहेत. त्यामुळे एमबीए, एमसीए करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा द्यावी, असे आवाहन असोसिएशनचे सचिव डॉ. प्रवीण जाधव, खजानिस डॉ. रंजना शिंदे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.