37118
बिनखांबी - मिरजकर तिकटी
एकेरी मार्ग धोकादायक
दिवसाढवळ्या वाहनधारकांकडून उल्लंघन; वाहतूक पोलिस गायब
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : मंगळवार पेठ परिसरातील बिनखांबी गणेश मंदिर ते मिरजकर तिकटी हा वाहतुकीसाठी असणारा एकेरी मार्ग अतिशय धोकादायक झाला आहे. दिवसाढवळ्या या मार्गावर उलट्या दिशेने वाहने नेऊन कायद्याची पायमल्ली केली जात आहे. या ठिकाणी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस दिसत नाहीत. बहुतांशवेळा ते गायब असल्याचेच दिसत आहे. त्यामुळेच बिनदिक्कतपणे सर्व प्रकारची वाहने अगदी बिनधास्त एकेरी वाहतुकीचा नियम तोडत असल्याचे चित्र आहे.
बिनखांबी मंदिर ते मिरजकर तिकटी हा मार्ग अतिशय दाटीवाटीचा व रहदारीचा मार्ग आहे. त्यामुळेच येथे एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. या मार्गावरच एक शाळा व एक अंधशाळा आहे. येथील विद्यार्थ्यांना उलट दिशेने येणाऱ्या या वाहनांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. एकेरी वाहतुकीचा फलक स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे बाहेरहून आलेल्या पर्यटकांची मोठी वाहने थेट या एकेरी मार्गावरून जातात. काही वाहने पुढे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर येथे, तर काही येथील शाळांच्या दारातच उभी केली जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होऊन स्थानिक नागरिकांनाही याचा त्रास होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.