कोल्हापूर

बावीस वर्षीय शिवम मद्रेवारने वर्षभरात मिळविली दहा पेटंट

CD

फोटो 37480

शिवम मद्रेवारने वर्षभरात मिळविली दहा पेटंट
पर्यावरणपूरक शेतीला बळ देणारे संशोधन; आधुनिक विज्ञान, पारंपरिक ज्ञानाचा उपयोग

संतोष मिठारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः सांगली जिल्ह्यातील जतमधील कृषी पदवीधर असलेल्या बावीस वर्षीय शिवम सत्यवान मद्रेवार याने कल्पकतेच्या जोरावर वर्षभरात केंद्र सरकारची दहा पेटंट मिळविण्याची किमया केली आहे. त्याने पर्यावरणपूरक शेतीला बळ देणारे संशोधन केले आहे.
कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयातून पदवीधर झालेल्या शिवम याने शेतकऱ्यांसाठी सोपे, कमी खर्चाचे आणि उच्च कार्यक्षमतेचे तंत्रज्ञान उपलब्ध करण्याच्या उद्देशाने दोन वर्षे संशोधन केले. या संशोधनाबाबत त्याने गेल्यावर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत केंद्र सरकारकडे चौदा पेटंटसाठी नोंदणी केली. त्यापैकी आतापर्यंत त्याची दहा पेटंटस् मंजूर झाली. त्यामध्ये रसायनमुक्त कीड व्यवस्थापन आणि नियंत्रण, तणनाशक फवारणी यंत्र आदींबाबतच्या पेटंटचा समावेश आहे. त्यातून पारंपरिक, सेंद्रिय शेतीला बळ मिळणार आहे. या संशोधनासाठी त्याला डॉ. रवींद्र पवार, ज्ञानेश्वर पतंगे, संग्राम धुमाळ, रवींद्र कारंडे, अभयकुमार बागडे यांचे मार्गदर्शन आणि वडील सत्यवान, आई सुष्मा यांच्यासह कुटुंबीयांचे पाठबळ लाभले. आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक ज्ञानाचा समन्वय साधून शेतीसाठी उपयुक्त ठरणारे संशोधन केले आहे.

पेटंट मिळालेले संशोधन असे
कृषिमालाच्या पॅकेजिंगसाठीच्या पॉलिथीन पिशव्या, फळे आणि भाज्या योग्य पद्धतीने काढण्यासाठीचे मल्टिपर्पज हार्वेस्टर, केळीच्या कंदावरील कीड नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रणाली आणि जैविक पद्धती, एकसमान तणनाशक फवारणी करणारे आधुनिक यंत्र आणि नॉझल, खते चांगल्या पद्धतीने जमिनीत पोहोचविण्यासाठीचे ॲप्लिकेटर, दूध पिशव्यांचा अपव्यय कमी करणारे पॅकेजिंग, हुमणी अळी, गेंडा कीड आणि हानिकारक कीटकांना रोखणारे स्वयंचलित उपकरण या संशोधनाचा समावेश आहे.
......
कोट
आपल्याकडे सेंद्रिय शेती करण्यासाठी जास्त संसाधन उपलब्ध होत नाहीत. ते लक्षात घेऊन मी अभ्यास केला. त्यातून मी केलेले संशोधन नावीन्यपूर्ण असल्याने त्याचे पेटंटमध्ये रूपांतर झाले. सोबतच शेतात लागणारी अनेक शेतीपूरक उपकरणेही तयार केली. यापुढे कृषी क्षेत्रात असेच संशोधन सुरू ठेवण्याचा ध्यास आहे. पदव्युत्तर शिक्षण घेणार आहे.
- शिवम मद्रेवार
.......
पीक उत्पादनात सुधारणा, आर्थिक नुकसान कमी
शेतीच्या प्रक्रिया वैज्ञानिक पद्धतीने पार पाडण्यासाठी मी प्रिसिजन फार्मिंग तंत्र विकसित केले. पिकांवरील कीटक आणि रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवून देणारे संशोधन मांडले आहे. त्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास पीक उत्पादनात सुधारणा होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी होण्यास मदत होईल, असे शिवम याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: पुण्यात गरवारे महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत तुफान हाणामारी, नेमकं काय घडलं?

MHADA House: म्हाडाचं घर स्वस्तात मिळणार, घरांच्या किंमती होणार कमी, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Palghar Crime: प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर ६ जणांचा सामूहिक अत्याचार, निर्जन बंगल्यात नेत कृत्य; तीन जण ताब्यात

Marathi News Live Updates : गरवारे महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या एमडींची तडकाफडकी उचलबांगडी; अविनाश रणखांब नवे व्यवस्थापकीय संचालक

SCROLL FOR NEXT