कोल्हापूर

मंगलमूर्ती अकादमी, श्री क्रिकेट विजयी

CD

46100
व्यास कदम
....
46099
प्रसाद कुंभार
...........
लोगो ः मेजर यादव टी-२० क्रिकेट स्पर्धा

मंगलमूर्ती अकादमी, श्री क्रिकेट विजयी

सेंच्युरियन, शाहूपुरी जिमखाना पराभूत ः व्यास कदम, प्रसाद कुंभार चमकले

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः ‘केडीसीए’तर्फे आयोजित मेजर यादव टी-२० क्रिकेट स्पर्धेत मंगलमूर्ती क्रिकेट अकादमीने सेंच्युरियन क्रिकेट अकादमीचा, तर श्री क्रिकेट स्पोर्टस् असोसिएशन ‘अ’ ने शाहूपुरी जिमखाना ‘क’चा पराभव केला.
राजाराम कॉलेजच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत आज झालेल्या पहिल्या सामन्यात सेंच्युरियन क्रिकेट अकादमीने २० षटकांत ६ बाद ११६ धावा केल्या. यात प्रसाद कुंभारने नाबाद ५०, क्षितिज भाटने ३८ धावा केल्या. ‘मंगलमूर्ती’कडून सुदेश कांबळे, विश्‍वराज डंबे यांनी प्रत्येकी दोन, स्वप्नील वांद्रे, आरिफ खान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. उत्तरादाखल खेळताना मंगलमूर्ती संघाने हे आव्हान १३ षटके २ चेंडूंत १ गड्याच्या मोबदल्यात ११८ धावा करीत सहज विजय मिळवला. यात सोहम खासबारदारने नाबाद ६६, श्रीनिवास डंबेने नाबाद ३९ धावा केल्या. सेंच्युरियनकडून तेजस पाटीलने एकमेव गडी बाद केला. हा सामना मंगलमूर्ती क्रिकेट अकादमी (क) ने नऊ गडी राखून जिंकला.

दुसरा सामना शाहूपुरी जिमखाना ‘क’ विरुद्ध श्री क्रिकेट स्पोर्टस् असोसिएशन यांच्यात रंगला. प्रथम फलंदाजी करताना श्री स्पोर्टस् असोसिएशनने २० षटकांत ७ बाद १९८ धावा केल्या. यात व्यास कदमने १०२, निखिल किल्लेदारने २३, सुशीलकुमार माने, मयूर पाटील यांनी प्रत्येकी १८ धावा केल्या. शाहूपुरी संघाकडून मिलिंद शिंदेने चार, तर श्रीकांत आमणे, दीपेश शेरे, विनोद शेरे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. उत्तरादाखल खेळताना शाहूपुरी जिमखाना ‘क’ संघाला हे आव्हान पेलले नाही. त्यांचा सर्व संघ १९ षटके ३ चेंडूंत १५० धावांत गुंडाळला. यात दीपेश शेरे, विहांग खातू यांनी ४४ धावा केल्या. श्री क्रिकेट स्पोर्टस् असोसिएशनकडून विजय घारेने भेदक गोलंदाजी करीत ४, तर संदीप जाधवने ३ आणि तुकाराम खोंद्रे व वीर देसाई यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT