कोल्हापूर

संक्षिप्त

CD

फोटो 47537

विवेक फाउंडेशन,
‘सरनाईकनगर मित्र’तर्फे
विविध उपक्रम

कोल्हापूर ः पाचगाव रोडवरील एन. टी. सरनाईक नगर मित्र मंडळ आणि विवेक फाउंडेशनतर्फे झालेल्या विविध उपक्रमांना प्रतिसाद मिळाला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोस्टर प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. आठ वर्षीय योगेशीष जाधवने ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा एकपात्री प्रयोग सादर केला.
रावण समुद्रे यांनी शिवचरित्रावर व्याख्यान दिले. फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक चंदालिया यांनी प्रदर्शनाची माहिती दिली. सावली केअर सेंटरचे संस्थापक किशोर देशपांडे, एन. टी. सरनाईक मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. सचिन जाधव, शिवा चौगुले आदी उपस्थित होते.

‘सागरा प्राण
तळमळला’ कार्यक्रमाचे
आज आयोजन

कोल्हापूर : स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य व विज्ञान मंडळातर्फे ‘सागरा प्राण तळमळला’ या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या कविता व राष्ट्रभक्तिपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मसमर्पण दिनानिमित्त बुधवारी (ता. २६) सायंकाळी साडेपाचला पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात कार्यक्रम होणार आहे. ‘नाद सुरमई’ संस्थेच्या कलाकारांचे सादरीकरण असून, सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक सतीश आंबर्डेकर, अध्यक्ष नितीन वाडीकर, उपाध्यक्ष एस. के. कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे केले.

शिलेदार हायकर्सतर्फे
पन्हाळा स्वच्छता मोहीम
कोल्हापूर ः येथील शिलेदार हायकर्स फाउंडेशनतर्फे किल्ले पन्हाळा येथे स्वच्छता मोहीम झाली. दुर्लक्षित राजमहल, अंबरखाना, बालेकिल्ला, पुसाटी बुरुज, सज्जाकोटीसह अन्य परिसरात स्वच्छता मोहीम झाली. तीसहून अधिक पोती प्लास्टिक, कचरा गोळा केला. पन्हाळा नगरपरिषदेच्या सहकार्यातून उपक्रम झाला. सहभागींना फाउंडेशनतर्फे टी शर्ट, प्रमाणपत्र दिले. फाउंडेशनचे संचालक नितीन पाटील, सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली. राजेंद्र साळोखे, उद्योगपती जयेश ओसवाल, चंदू माने-अण्णा माने स्पोर्टस्‌चे सहकार्य लाभले. पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. फाउंडेशनचे ओंकार पावले, श्रीधर कांबळे, प्रथमेश पोवार, आदित्य पाटील, अभिषेक कांबळे, ओंकार घाटगे, स्वरूप मिठारी, सृजन पाटील, पार्थ यादव, प्रसाद कांबळे आदींचा सहभाग होता. अक्षयकुमार फॅन्स क्लबचे अध्यक्ष सायकलपटू राम कारंडे सहभागी झाले.

शाहूपुरीत शुक्रवारी
रक्तदान शिबिर

कोल्हापूर ः येथील बाळ नाईकनवरे फाउंडेशन व नाईकनवरे कुटुंबीयांसह परिसरातील मंडळांतर्फे शुक्रवारी (ता. २८) रक्तदान व मोफत महाआरोग्य शिबिर होणार आहे. संजीवन ब्लड बँक व सनराईज हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होणार आहे. छातीत दुखणे, दम लागणे, उच्च रक्तदाब, सांधेदुखी, मधुमेह, गुडघेदुखी, लिगामेंट, जन्मजात झडपांचे आजार, प्रोस्टेट ग्रंथीची वाढ आदी तक्रारींवर शिबिरात उपचार व मार्गदर्शन होणार आहे. गरजूंसाठी मोफत ईसीजी, रक्तातील साखर तापासणी होणार आहे. शाहूपुरी कुंभार गल्लीतील पंचमुखी गणेश मंदिर हॉलमध्ये सकाळी नऊ ते एकपर्यंत रक्तदान शिबिर, तर सायंकाळी चारपर्यंत आरोग्य शिबिर सुरू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil Criticism Pune Bridge Project : पुण्यातलं आठवं आश्चर्य! या ब्रिजवर चढू शकता पण उतरू शकत नाही, कंत्राट द्यायच्या घाई गडबडीत चूक; जयंत पाटलांचा टोला

T20 WC, NZ vs SA: 'गालावर थोबाडीत मारली असं... ', न्यूझीलंडविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर एडेन मार्करम काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : शेअर मार्केटच्या आमिषाने ज्योतिषाकडून कोट्यवधींची फसवणूक, सायबर पोलिसांची लूक आऊट नोटीस

बापरे! वर्षा उसगांवकरांची लाखो रुपयांची फसवणूक, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, नक्की काय घडलं?

Pune Crime News : पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या हुल्लडबाज विद्यार्थ्याला वडिलांची कॉलेजमध्ये घुसून बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT