कोल्हापूर

तारदाळ : उरूस लेख-१

CD

८ कॉलम रंगीत पट्टी

तारदाळची महालक्ष्मी देवी यात्रा, गैबीसाो पीर उरुस विशेष
................
48985, 48986
तारदाळ ः येथील ग्रामदैवत शिरकाई देवी. दुसऱ्या छायाचित्रात शिरकोली येथील पुरातन मंदिर.
.......
मोसे खोऱ्यातील मावळ्यांचे कुलदैवत
शिरकोलीची आई देवी शिरकाई
..........
एंट्रो...
हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील प्रसिद्ध देवस्थान म्हणून गावच्या शिरकाई ग्रामदेवतेचा उल्लेख होतो. प्रतिवर्षी महाशिवरात्रीनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी यात्रा व बुधवारी उरुस असे वंशपरंपरागत चालत आलेले आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला या यात्रेला ८० वर्षांची परंपरा आहे. त्यानिमित्त...
..........
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि सरसेनापती वीर बाजी पासलकर यांच्या ८४ मोसे खोऱ्यातील मावळ्यांचे कुलदैवत म्हणजे शिरकोलीची शिरकाई देवी. नवसाला पावणारी, भक्तांच्या हाकेला धावणारी, पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील ८४ मोसे खोऱ्या‍तील मौजे शिरकोली गावची शिरकाई देवी. या देवीच्या दर्शनाला जाताना पुणे-स्वारगेटवरून पुणे-पानशेत-शिरकोली एस.टी.ने पानशेतवरून जलवाहतूकही आहे. पानशेत धरण आणि इथले निसर्गरम्य वातावरण अत्यंत आल्हाददायक आहे.
शिरकोली गावातील शिरकाई मंदिरामध्ये असणारी मृर्ती काळ्या पाषाणात महिषासुरमर्दिनी रूपातील आहे. या अष्टभूजा देवीने एका हातात महिषासुराची शेंडी पकडली आहे, तर इतर हातात शंख, चक्र, त्रिशुल, पाणपत्र, बिछवा, धनुष्य व बाण आहे. देवीचा डावा पाय रेड्याच्या पाठीवर आहे. देवीची यात्रा चैत्र पौर्णिमेच्या प्रतिपदेस भरते. शिरकोली गावात यात्रेला भक्तांची मोठी गर्दी होते. तर नवरात्रीला नऊ दिवस विविध धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रम होतात. अष्टमीला जागरण, होमहवन होऊन दशमीला सोने लुटून दसऱ्याच्या दिवशी लेकी-सुना दोऱ्यायाला बांधलेली खोबऱ्याची वाटी देवीला अर्पण करतात, ही पूर्वापार प्रथा आहे. दसऱ्याच्या दिवशी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. यात्रेला आलेल्या भक्तांना दिवसभर महाप्रसादाचे वाटपही केले जाते. शिरकाई, मानाई व वाघजाई या तिन्ही देवींचे दर्शन येथे भक्तांना घडते. देवीच्या बाजूला भक्तांचे संकट दूर करणारे रक्षक आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामदैवत शिरकाई देवी म्हणजेच तारदाळ येथील असणारे शिरकाई देवीचे मूळपीठ असावे, असे अभ्यासक सांगतात.
‘दिव्य ज्योत शक्ती, पूज्य भाव भक्ती’ म्हणजे शिरकाई देवी. शिरकोलीचे शिरकाई देवी मंदिर हे शिवकालीन मंदिर असून, ते अंबी नदीकाठी वसलेले आहे. मंदिराच्या उजव्या बाजूस रायगड किल्ला, तर डाव्या बाजूस राजगड, तोरणा किल्ला आहे. शिरकाई देवीच्या समोरच्या बाजूस खडकवासला धरण आहे. सिंहगड, ओसाड जाईला वंदन करून ए. जे. तानाजी सागर म्हणजेच पानशेत धरण (वीर बाजी पासलकर धरण) लागते. पानशेत धरण पुनर्वसनात मंदिराला पाणी लागल्यामुळे शिवकालीन मंदिराची मूर्ती विधिवत प्राणप्रतिष्ठापणा करून नवीन बांधलेल्या मंदिरात प्रतिष्ठापित केली. हे शिरकोलीचे शिरकाई मंदिर आहे. शिरकाईच्या डाव्या बाजूला मानाई, तर समोरच वाघजाई देवी दर्शन देते. शिरकाईला पडवळ, पासलकर, भोसले, साळेकर, आमगुडे, निवंगुडे, कडू, कुंभार, कदम, मानकर, राजेशिर्के, बोरगे, हेळदकर, माने, मोरे, तावरे, लोहकरे, नरावडे आदी १२ बारा बलुतेदार कुलदैवत मानतात.
शिरकाई देवीचा महिमा अपरंपार आहे. मोसे खोऱ्यात स्वराज्य स्थापनेत मावळ्यांचा सिंहाचा वाटा होता. मंदिराच्या दिवाबत्तीचा खर्च राजगडावरून येत होता. जिजाऊ माता व छत्रपती शिवराय देवीला स्फूर्तिस्थान मानायचे. देवीच्या कृपेने कोकणच्या कोळी राजाच्या त्रासातून मोसे खोरे मुक्त केले. मावळमढा कोळी राजाच्या त्रासाने हैराण झाला होता. त्रासातून मुक्त होण्यासाठी मावळ्यांची बैठक झाली. बैठकीचे नेतृत्व वीर बाजी पासलकर यांनी केले. त्यावेळी आई शिरकाईने विजय निश्चितीचा कौल दिला. यावेळी कोळी राजाला निमंत्रण देऊन शिरकोली गावाला म्हणजेच विलालपूर माळावर बोलाविले. शिरकोली गावचे ग्रामस्थ म्हणजेच पासलकर, पडवळ, साळेकर वराडी झाले. यासाठी शामियाना उभारला. कोळी राजा शिरकोली गावी निघाला. त्याच्या पाळतीवर केदळकर, बामुगडे, कडू, निवंगुणे दबा धरून बसले. मानकर, तावरे, नरावडे, लोकरे, सांगडे, हरेकर आदी त्यांच्या साथीला होते. यामध्ये कोळी राजावर हल्ला करून मावळ्यांनी त्याचा पराभव केला. त्याच्या त्रासातून मोसे खोरे मुक्त केले. यावेळी शिरकाई देवीचे वरदान सफल झाले. त्यावेळेपासून शिरकाईला नवसाला पावणारी व हाकेला धावणारी आई शिरकाई असे संबोधण्यात आले. त्यावेळेपासून शिरकाई देवीची यात्रा मोठ्याने भरते. या यात्रेच्या पालखीचा मान पासलकर कुटुंबीयांना आहे, असा इतिहास सांगतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT