कोल्हापूर

गड- संक्षिप्त

CD

घाळी महाविद्यालयात
राष्ट्रीय विज्ञान दिन
गडहिंग्लज ः राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त येथील डॉ. घाळी महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांची देहवस्तूमान निर्देशांक व रक्तदाब तपासणी करण्यात आली. प्राचार्य डॉ. दत्ता पाटील यांच्याहस्ते उद्‍घाटन झाले. शिबिरात १२० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७५ विद्यार्थी कमी वजनाचे व २५ विद्यार्थी सामान्य वजनाचे आढळून आले. याबाबत विद्यार्थ्यांना आरोग्यसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. सीमा साखरे यांनी प्रास्ताविकात उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला. प्रा. निखिल घुळाण्णावर यांनी आभार मानले. प्रा. महेश कदम, डॉ. श्रीकांत पाटील, प्रा. संतोष बाबर, प्रा. जबिना पटेल, प्रा. संदीप परीट, प्रा. संतोष कांबळे, प्रा. अंकिता चोपडे, प्रा. आकाश नारायणकर, प्रा. सौरव पाटील आदींनी नियोजन केले.
...............
न्यू ब्लॉसम स्कूलमध्ये
स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण
गडहिंग्लज ः भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील न्यू ब्लॉसम प्री-स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात झाला. अध्यक्ष मोहसीन मुल्ला व उपाध्यक्ष अलमास मुल्ला, सरपंच वंदना शेंडुरे, पोलिसपाटील उदय पुजारी प्रमुख उपस्थित होते. गणित परीक्षेत यश मिळविलेल्या श्रीशा कोडोली, आविष्का बंदी, संभाजी चाळूगोळ, सान्वी चिलमी, आरुषी शेंडुरे, प्रांजल पाटील, सान्वी भनसे या विद्यार्थ्यांना चषक देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांना मोरे यांनी रोख एक हजार रुपयांचे बक्षिस दिले. श्रीशा कोडोलीला बेस्ट स्टुडंट पुरस्कार देऊन गौरविले. वसंत नाईक, तलाठी रूपाली कांबळे, मुनीर अल्लाखान, प्रशांत ढवळे, अनिता ढवळे, प्रिया डांगे, विजया चव्हाण, यास्मीन मूला, अंजुम जमादार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Buses Upgrade : राज्यात एसटी बसेसचे रुपडे पालटणार, बैठक व्यवस्था बदलून नव्याने ३ हजार बसेस रस्त्यावर धावणार

घरकुलचं अनुदान हवं असेल तर २५ हजार दे, अभियंत्याकडून मागणी; १० हजाराची लाच घेताना ACBने केली अटक

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या! एसटीला दररोज दीड कोटींचा तोटा; प्रशासनाचं नियंत्रण नाही, मंत्री सरनाईकांची नाराजी

Latest Marathi News Live Update : पुणेकरांनो काळजी नसावी! आज पाणी पुरवठा बंद राहणार नाही

SCROLL FOR NEXT