कोल्हापूर

आहेर होतोय लग्नातून बाहेर,

CD

आहेर होतोय, लग्नातून बाहेर
ट्रेंड बदलतोय ः दारातील लग्नसोहळा गेलाय हॉलला


अनिल एच. मोरे ः सकाळ वृत्तसेवा
बोरपाडळे, ता.२४ : लग्न म्हणजे दोन व्यक्तींची मने, घरे, गावे आणि संस्कार एकत्र आणणारा समारंभ. दोन भागातील चालीरिती, परंपरा अन् आचार विचारांना जुळवणाऱ्या या सोहळ्याचे स्वरूप बदलत आहे.
पूर्वी ग्रामीण भागात लग्न म्हणजे गाव सोहळा व्हायचा. लग्नात आहेर हा तर अगदी जिव्हाळ्याचा विषय असायचा. ऐपतीप्रमाणे प्रत्येकजण आहेर करायचा. याचे वाचनही जाहीरपणे व्हायचे लाऊड स्पीकरवर. पण सध्या आहेर लग्न सोहळ्यातून बाहेर जातोय की काय अशी परिस्थिती आहे. फक्त फुलांचा बुके बस्स. पूर्वी एखाद्या श्रीमंताच्या सोहळ्यात ‘नो आहेर''ची हाक असायची. आता सर्रास लग्न समारंभात ‘आपली उपस्थिती हाच आहेर'' असे लिहल जाते. दारातील लग्न सोहळ्याची पद्धतही हॉलला गेली. त्यामुळे घरी येणाऱ्या, मुक्कामाची पाहुण्यांची प्रथा थांबली. लग्नामध्ये पै- पाहुणे, ग्रामस्थ तसेच मानकऱ्यांना पसंती दिली जायची. आता कार्यालयाच्या दारात हलगी कडाडते.

कोट
परिवर्तन हा जरी निसर्गाचा नियम असला तरी मंगलाष्टकासमयी अक्षता फेकून मारणे, हार घालताना नवरीला उंच उचलणे, वरातीप्रसंगी उंची आवाजावर हिडीस नृत्य आदी प्रकार लग्न संस्कारास बाधक आहेत. प्रेम, आपुलकी अन् जिव्हाळा हळूहळू कमी होतोय.
- श्रीकांत जोशी, बोरपाडळे

कोट
दारातील लग्नाला नवयुवकांची नापसंती आहे. शिवाय जेवणांसह इतर उठाठेवही जमत नाही. वेगवेगळ्या इव्हेंटसाठी हॉललाच पसंती दिली जात आहे.
- के.एस. पाटील, सामाजिक कार्यकर्ते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निधी मंजुरीसाठी मागितली लाच, ६ लाखांची रोकड स्वीकारताना मंत्रालयातला अधिकारी अडकला सापळ्यात; खारघरमध्ये रंगेहाथ पकडलं

तुम्हीच लग्न करून मुलं का जन्माला का घालत नाही, शंकराचार्यांचा सरसंघचालक मोहन भागवतांना सवाल

भारताची लेक बनणार वॉशिंग्टनची महापौर? कोण आहे ३१ वर्षीय रिनी संपत?

Latest Marathi News Live Update : खारघरमध्ये लाच घेताना मंत्रालयातील अधिकाऱ्याला अटक

Sunetra Pawar: अवकाळी पावसामुळे हातात आलेलं पीके गेली; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, बारामतीतील शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी..

SCROLL FOR NEXT