कोल्हापूर

मंदीर कायदा रद्द करुन महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात द्या : भारत नगर येथील धम्म चक्र बुद्ध विहारतर्फे मागणी

CD

फोटो : 49656

महाबोधी महाविहार
बौद्धांच्या ताब्यात द्या

धम्म चक्र बुद्ध विहारतर्फे संजय तेली यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : गया (बिहार) येथील महाबोधी महाविहाराचा मंदिर कायदा १९४९ रद्द करून तो बौध्दांच्या ताब्यात द्या; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भारतनगर येथील धम्मचक्र बुध्दविहारातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यता आला.
निवेदनात म्हंटले आहे की, बिहार राज्यातील गया या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुध्दांना ज्या महाबोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. त्याठिकाणी सम्राट अशोक राजाने ई.पू. तिसऱ्या शतकात महाबोधी विहार बांधले आहे. हे सर्वात जुने विहार आहे. या विहाराचा २००२ मध्ये जागतीक हेरिटेज (जागतीक वारसा स्थळ) मध्ये समावेश केला आहे. जगभरातील बौध्द उपासकांचे ते पवित्र ठिकाण आहे. मात्र, काही वर्षांपासून या ठिकाणी बौध्देत्तर समुहाचे व्यवस्थापन आहे. परिणामी बौध्द आचरण पध्दतीला बाधा पोहचत आहे. या ठिकाणी इतर धर्मीय अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे हे विहार बौध्दांच्या ताब्यात मिळावे, यासाठी अखिल भारतीय बुद्धीस्ट फोरम आणि विविध संघटनांचे गेल्या १२ फेब्रुवारी पासून आंदोलन सुरू आहे. या मागणीला पाठींबा आहे.
अध्यक्ष सोमनाथ घोडेराव, प्रकाश अंगरखे, गोविंद वैद, तानाजी निकम, सदाशिव सांगावकर, संग्राम सोनवणे, अभिषेक ओव्हाळ, रोहित चंद्रे, धम्मपाल घोडेराव, डॉ. सिध्दार्थ घोडेराव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT