51075
कोल्हापूर ः यड्राव येथे झालेल्या १६ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्यांसोबत मान्यवर उपस्थित होते.
...............
बुद्धिबळ स्पर्धेत
विवान सोनी अजिंक्य
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः यड्राव येथे झालेल्या १६ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत विवान सोनीने विजेतेपद, तर अभय भोसलेने उपविजेतेपद पटकाविले.
केन चेस अकादमी (इचलकरंजी) व चेस अकाद (जयसिंगपूर) यांच्यातर्फे यड्रावच्या अल्फान्सो स्कूलमध्ये ही स्पर्धा आयोजित झाली. यामध्ये ११ ते १६ वर्षांखालील ६५ बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला होता. यापैकी नऊ बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकनप्राप्त होते. जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार झालेल्या या स्पर्धेत विवान सोनीने विजेते, तर अभय भोसलेने उपविजेतेपद पटकाविले. अन्य विजेत्यांमध्ये अथर्व तावरे, आराध्य ठाकूर-देसाई, आदित्य कोळी यांचा समावेश होता.
१५ वर्षांखालील मुलांमध्ये अनन्या व्हनवडे, शर्वरी अंबी, संकेत हावळ, १४ वर्षांखालील गटात रुद्र माने, संस्कृती सुतार, सूरज शिकलगार, तर १३ वर्षांखालील गटात सिद्धी बुबने, आराध्या रुग्गे, अथर्व नाझरे, तर १२ वर्षाखालील गटात सिद्धी कर्वे, हित बलदवा, सिद्धेश वड्डे, ११ वर्षांखालील गटात वेदांत बागड, अर्णव रुग्गे, स्वरा पाटणी, मुलींमध्ये धनश्री पोर्लेकर, श्रावणी कोडोले, मृणाल पांडव यांना बक्षीस देण्यात आले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ निस्सार कडेगावकर, उदय कुंभार, राजेश चौगुले यांच्या हस्ते झाला.
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.