कोल्हापूर

पी एन जी कोल्हापूर आवृत्ती साठी लेख आणि फोटो

CD

कोल्हापूर आवृत्तीसाठी ठळक घ्यावी.
...............
फोटो-५३५०६
--------------
‘पीएनजी’ची कोल्हापुरात दुसरी शाखा

ताराबाई पार्कात पितळी गणपतीसमोर आजपासून प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : सांगलीतील मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफी पेढीची येथे दुसरी शाखा सुरू होत आहे. ताराबाई पार्कात श्री पितळी गणपतीसमोर हे दालन असेल. चौदा वर्षांपूर्वी ‘पीएनजी’ने कोल्हापुरात व्हीनस कॉर्नर येथे शाखा सुरू करून पदार्पण केले. ग्राहकांच्या भरघोस प्रतिसादानंतर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन दुसरी शाखा सुरू होत आहे. उद्यापासून (ता. २६) शाखेस प्रारंभ होत आहे.
अविरत १९२ वर्षे विश्वासार्हता, सचोटी, ग्राहकाभिमुख दृष्टिकोन या त्रिसूत्रीने ग्राहककेंद्रित वाटचाल करीत ‘पीएनजी’ने नवनवे बदल स्वीकारत, नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारले आहे. सांगलीत मुख्य शाखा सराफ कट्ट्यानंतर, विश्रामबाग, मिरज, कोल्हापूर, चिपळूण, रत्नागिरी, कऱ्हाड, इचलकरंजी तसेच कर्नाटकमध्ये बेळगाव, विजापूर, जमखंडी असा विस्तार केला आहे. हुबळी येथेही येत्या काळात ‘पीएनजी’ची शाखा सुरू होत आहे.
दुसऱ्या नवीन शाखेमध्ये सोने, चांदी आणि हिरे हे प्रमुख विभाग असतील. सोबतच ट्रेंडी ज्वेलरीमध्ये मंगळसूत्र, नेकलेस, गोठ, बिलवर, पाटल्या, बाजूबंद, तोडे, साज, नथ आदी अनेकविध दागिने येतात. तसेच आधुनिक दागिन्यांमध्ये कमी वजनाच्या दागिन्यांचे ‘मुक्ता कलेक्शन’देखील आहे. ‘मुक्ता’मध्ये मोत्यांचा वापर करून बनवलेली लाईट वेट फॅशन व ब्रायडल ज्वेलरी उपलब्ध आहे. याचबरोबर बंगाली, कलकत्ती, गोकाक, टेम्पल, पोलकी डिझायनर ज्वेलरी उपलब्ध आहे.
चांदीमध्ये तरुण पिढीला आवडतील असे कॅज्युअलवेअर, पार्टीवेअर, ऑफिसवेअरमध्ये ब्रेसलेट, अंगठी, पेंडंटची विविधता मिळेल. शिवाय विविध मूर्ती, पूजेचे साहित्य, गिफ्ट आर्टिकल्सही उपलब्ध असतील. प्रमाणित हिऱ्यांचा स्वतंत्र विभाग असेल. पीएनजी एक्स्ट्रा सुपर डिलक्स डायमंडसोबत मार्केट क्वालिटीचे डायमंडचेही दागिने उपलब्ध आहेत. हिरे दागिन्यांमध्ये मंगळसूत्र, पेंडंट, छोटे आकर्षक इअररिंग, कपल रिंग्ज, वेस्टर्न डिझाईनच्या असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत. सध्याच्या मार्केट ट्रेंडनुसार रोज गोल्ड हिरे दागिन्यांची मोठी श्रुंखला खुली आहे. अगदी पंधरा हजारांपासून डायमंड दागिन्यांची श्रेणी उपलब्ध आहे. रत्नावलीमध्ये हिऱ्याबरोबरच उच्च प्रतीचे पाचू आणि माणिक वापरले आहेत. ग्राहकांना त्यांच्या राशीप्रमाणे राशीरत्नेही उपलब्ध आहेत. ही रत्ने नैसर्गिक, प्रायोगिक तत्त्वावर अनुभवण्याची सुविधा, खात्रीशीर परतावा, अल्प किमतीत उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Pune News: नागपूर खंडपीठाचा निर्णय! आरटीई प्रवेशातील अंतराची अट स्थगित; पालकांना पुन्हा अर्ज करण्याची संधी, काय आहे आदेश..

Harish Rana : इंजिनिअर होण्याचं स्वप्न अपुरं… १३ वर्षे कोमात झुंजलेल्या मुलाला इच्छामरण; वडिलांच्या डोळ्यांत अश्रू, शब्दही थरथरले…

Latest Marathi News Live Update : देशभरात गॅस सिलिंडर टंचाईमुळे लोकांची धावाधाव सुरूच

30-Year Journey of Homemade Spice Business: कांडप यंत्रातून उभा राहिला स्वादाचा प्रवास; परळीच्या जाधव मसाल्याची ३० वर्षांची परंपरा

SCROLL FOR NEXT