कोल्हापूर

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगावाढीला मिळणार बळ

CD

फोटो 53452

इंजिनिअरींग असोसिएशन-
सिडीबी बॅंकेत सामंजस्य करार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगाच्या (एमएसएमई) वाढीसाठी, केंद्र शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या योजना अधिक सक्षमपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशन आणि सिडबी (स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बॅंक ऑफ इंडिया-शाखा कोल्हापूर) यांच्यात सामंजस्य करार झाला.
या कराराच्या माध्यमातून सिडबी एमएसएमईसाठी राबवणाऱ्या योजनांची माहिती तसेच त्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी दुवा म्हणून काम करणार आहे. एमएसएईची व्यवसाय वृद्धी आणि श्वाश्वत विकास असा या कराराचा मुख्य उद्देश आहे. निवडक चार पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे त्यांचे कौशल्य वाढणार आहे. असोसिएशनला एमएसएमईच्या पायाभूत सुविधा सुधारण्यास, उद्योगांसाठी व्यवसाय समर्थन सेवा, वितरण सुधारण्यास मदत होईल. या करारावर असोसिएशनतर्फे अध्यक्ष बाबासोा कोंडेकर आणि सिडबी बॅंकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर मनोज डिंगरा यांनी सह्या केल्या. उपाध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, सचिव प्रसन्न तेरदाळकर, सिडबी बॅंकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर राजकुमार सिंग, शांताराम सुर्वे, नारायण अंगडी, ऐश्वर्या जाधव, प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे उपस्थित होते.

‘सिडबी’ अशा पद्धतीने काम करणार?
सिडबी या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच समन्वयातून काम करण्यासाठी एक पात्र आणि अनुभवी कर्मचारी नियुक्त करणार आहे. त्यांच्या माध्यमातून इंजिनिअरिंग असोसिएशन आणि एमएसएईला कर्जाशी निगडीत अर्ज भरण्यासाठी तसेच इतर संबंधित कामांमध्ये सहाय करतील. यासाठी संबंधित कर्मचारी असोसिएशनच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित असेल. त्यांच्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा सिडबीकडून दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

पाणी मागणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेला ‘मुले चोरणारी’ समजून मारहाण, नागपूरमधील धक्कादायक प्रकार...

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Latest Marathi Live Update: सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT