वर्षभरात आढळले क्षयरोगाचे १४०९ रुग्ण
डॉ. रुपाली दळवी; २०२३ च्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण कमी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः गेल्या वर्षात क्षयरोगाचे १ हजार ४०९ रुग्ण सापडले. त्यातील ७२ जणांचा मृत्यू झाला. पण, २०२३ च्या तुलनेत क्षयरुग्णांचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. शंभर दिवसांच्या कार्यक्रमामध्ये ४४४ नवीन रुग्ण आढळले, असे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली दळवी यांनी सांगितले.
महापालिका क्षयरोग नियंत्रण सोसायटीच्या वतीने शंभर दिवसांच्या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धा, ऊसतोडणी मजूर, बांधकाम कामगारांबरोबरच शहरात कार्यशाळा घेऊन प्रबोधन केले. त्यानुसार आज पत्रकारांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. त्यामध्ये त्या बोलत होत्या.
डॉ. दळवी यांनी महापालिकेच्या वतीने राबवलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना क्षयरोगाची शक्यता असते. दोन आठवड्याचा खोकला, सर्दी, ताप, अशक्तपणा ही लक्षणे आहेत. संशयितांच्या सर्व तपासणी मोफत करून औषधेही मोफत दिली जातात. साधा क्षयरोग असेल तर सहा महिन्याचे औषधोपचार असतात. एमडीआरसाठी १८ महिन्यांचा औषधोपचार घ्यावा लागतो. प्रभावी औषधांमुळे एमडीआर सहा महिन्यांच्या उपचारांनी बरा होतो.’
डॉ.अमरसिंह पोवार म्हणाले, ‘१०० दिवसांत शहरातील १ लाख ३ हजार जणांची तपासणी केली. गेल्यावर्षीचे ७४० रुग्ण उपचार घेत आहेत. जनजागृतीसाठी रांगोळी, पाककृती स्पर्धा, तसेच शालेय विद्यार्थ्यांची रॅली असे उपक्रम घेतले.’ आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी क्षयरोगाची लक्षणं, तपासणी आणि उपचाराची माहिती दिली. यावेळी उपायुक्त पंडित पाटील, डॉ. अमोलकुमार माने आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.