कोल्हापूर

फुटपाथ नुतनीकरण

CD

फोटो 54111
ताराराणी चौकातील पदपथ परिसराचे
अयोध्या डेव्हलपर्सतर्फे सुशोभीकरण

कोल्हापूर, ता. २८ ः ‘स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर’ योजनेंतर्गत छत्रपती ताराराणी चौकातील विभागीय कार्यालयासमोरील पदपथ परिसराचे सुशोभीकरण अयोध्या डेव्हलपर्सचे व्ही. बी. पाटील यांनी केले. त्याचे उद्‍घाटन प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते आज झाले.
चौकात विभागीय कार्यालयाची इमारत आहे. त्यासमोरील मुख्य रस्त्यालगत पदपथ आहे. शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेला हा परिसर अनेक वर्षे दुर्लक्षित होता. तिथे असलेल्या झाडांच्या सावलीमुळे भिकाऱ्यांची संख्या वाढत चालली होती. तसेच परिसरही गलिच्छ होत होता. त्याठिकाणी येणाऱ्या नागरिकांना, प्रवाशांना त्रास होत होता. अशा चार हजार चौरस फुटाचा परिसर स्वच्छ आणि सुशोभित करून पेव्हिंग ब्लॉक बसविले आहेत. तसेच १५० फूट लांबीचा ग्रॅनाईट टाईल्सचा कट्टाही तयार करण्यात आला असून, प्रवाशांच्या बैठकीची व्यवस्था झाली आहे. यावर सात ते आठ लाख रुपये खर्च झाले आहेत. यावेळी व्ही. बी. पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश कांबळे, अभियंता मीरा नगिमे, अवधूत नेर्लेकर, उमेश बागुल आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाचं निरीक्षण; स्वतःहून नोकरी सोडल्यास...

Mumbai Missing link Project: मिसिंग लिंकच्या बोगद्याखाली गुप्त बोगदा, आव्हानात्मक काम झालं सोपं; भविष्यातही बनणार संकटमोचक!

माफी नंतरही वाद शमेना! धीरेंद्र शास्त्रींची शिवभक्त असल्याचं दाखवण्याची धडपड, शिवरायांचे चित्र असलेला सदरा केला परिधान

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरात वीजनिर्मिती प्रकल्पातील दोन संच पडले बंद

Shivaji University Hostel food issue : शिवाजी विद्यापीठ वसतिगृहातील जेवणात अळ्या, किडे; शिवसेना आक्रमक, वारंवार घटनेने विद्यार्थ्यांची हेळसांड

SCROLL FOR NEXT