फोटो 54151
किसान संघाचे खर्डा-भाकरी आंदोलन
शेतीमाल हमी भावाने खरेदी न केल्याने निषेध
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : सरकारने शेतीमाल हमी भावाने खरेदी न केल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोड होणार नाही. त्यामुळे पोळीऐवजी खर्डा भाकरी खाण्याची वेळ आली आाहे. याच्या निषेधार्थ भारतीय किसान संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खर्डा-भाकरी खाऊन अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.
आंदोलनानंतर शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षेने महायुतीला विधानसभा निवडणुकीत भरभरून मते देऊन राज्याची सत्ता दिली. निवडणूक प्रचारात महायुतीकडून कर्जमुक्ती, सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस यांची हमी भावाने खरेदी केली जाईल, अशी आश्वासने दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक अडचणींना तोंड देत शेतीमाल पिकविला. सरकारकडून घोषणा झाल्या. परंतु, प्रत्यक्ष प्रशासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी परिणामकारकरीत्या झाली नाही. यावरून प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. सरकारचा त्यावर कोणताच वचक नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. या उलट शेजारील राज्यांत शेतकऱ्यांचा विचार अधिक सहानुभूतीपूर्वक झालेला आहे. मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनसाठी ४५० रुपयांचा बोनस अधिक एम.एस.पी. रक्कम दिली. तेलंगणा सरकारने ९० टक्के कापसाची खरेदी केली. कर्नाटक सरकार तुरीची खरेदी ५० रुपये बोनस आधिक एम. एस. पी. देऊन आठ हजार क्विंटल दराने करत आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारचे धोरण काय आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
आंदोलनात मदन देशपांडे, बाळगोंडा पाटील, रामचंद्र चौगले, सिद्धार्थ शिंदे, सचिन जाधव, रामभाऊ पाटील, के. डी. पाटील आदी सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.