थकीत करांची वसुली करण्यात अपयश
संदीप देसाईः महापालिका अंदाजपत्रकात १०० कोटींवर तूट
कोल्हापूर, ता. ४ ः महापालिका थकीत करांची वसुली करण्यात अपयशी ठरली असल्याने अंदाजपत्रकात यंदा १०० कोटींवर तूट आली आहे. प्रशासनाने या थकबाकीच्या वसुलीसाठी कारवाईची धमक दाखवली नाही तर यंदीही तीच स्थिती होणार असून, विकासकामे होणार नाहीत. यातून महापालिका डबघाईला चालली आहे, अशी टीका आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली.
देसाई म्हणाले, ‘ यंदा १५० कोटींवर तूट जाण्याची शक्यता आहे. प्रशासकांनी वसुलीसाठी कडक भूमिका घेऊन भ्रष्टाचार थांबवावा. घरफाळ्याची ३१ कोटी रुपयांची थकबाकी असलेल्या ५० मिळकतधारकांवर कारवाई नाही. सव्वा लाखांवर असलेल्या मिळकतींपैकी दोन वर्षात २५ हजारावर मिळकतींचा रिव्हीजन सर्व्हे पूर्ण केला आहे. यामुळे वाढीव उत्पन्नाचा मार्ग थांबला आहे. स्वप्नांचे इमले व कल्पनांचे मनोरे अंदाजपत्रकात बांधले आहेत. पाणीपट्टी विभागाने २५० एमएलडी उपसा करून वीजेवर खर्च वाढवला. गळती रोखण्यासाठी तरतूद नाही. अनेक प्रकल्प मागील पानावरून पुढे अशा स्थितीत आहेत. गेल्यावर्षी रंकाळा महोत्सवासाठी २५ लाखांची तरतूद केली. परंतु महोत्सव झाला नाही. यंदा तरतूदच नाही. महापालिकेच्या नवीन इमारतीसाठी निधी नाही. महापालिका शाळांच्या पायाभूत विकासासाठी तरतूद नाही. सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी दोन बजेटमध्ये तरतूद केली, पण ती टेंडरमध्ये अडकली. ख्रिस्ती, मुस्लिम, लिंगायत समाजासाठी समाजासाठी पुरेशी दफनभूमी नाही. हवा प्रदूषणात शहर अव्वल होत निघाले आहे. कर्ज रोखे उभारून विकास करणे अपेक्षित नाही. आकृतीबंधाप्रमाणे नवीन भरतीनंतर खर्चाची तरतूद केलेली नाही.’
यावेळी उत्तम पाटील, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, समीर लतीफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, अनिल जाधव, शशांक लोखंडे, आदम शेख, रमेश कोळी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.