chd241.jpg
59693
नांदवडे ः रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचा प्रारंभ करताना राजेश पाटील. शेजारी राजेंद्र कांबळे, विठोबा गावडे आदी.
-----------------
आश्वासन पूर्ततेची मोठी उपलब्धी
राजेश पाटील; नांदवडे येथे विकासकामांचे उद्घाटन
चंदगड, ता. २६ ः ‘‘जनतेचे नेतृत्व करीत असताना जी-जी आश्वासने दिली, त्याची पूर्तता करण्याचे भाग्य मला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या कामांसाठी निधी लावता आला. ही माझ्यासाठी मोठी उपलब्धी आहे,’’ असे मत माजी आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले. नांदवडे (ता .चंदगड) येथे ३ कोटी ४३ लाखांच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच राजेंद्र कांबळे यांनी होते.
ताम्रपर्णी नदीवर माऊलीचा गोंड येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा, श्री माऊली मंदिरासमोरील सभागृह बांधकाम, कृष्णा सुतार यांच्या घरापासून ते हायस्कूलपर्यतच्या रस्त्याचे डांबरीकरण, शेवाळे येथील दलित वस्ती स्मशानभूमी रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, मुख्य रस्ता ते दलित वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, श्री माऊली मंदिर ते चव्हाट्यापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे, शेवाळे मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवणे या कामांचा पाटील यांच्या हस्ते प्रारंभ केला. सरपंच राजेंद्र कांबळे, विठोबा गावडे यांनी विविध विकासकामांना चालना दिल्याबद्दल पाटील यांचे ऋण व्यक्त केले. भरमाणा गावडे, अॅड. संतोष मळवीकर यांनी मनोगत व्यक्त केले. महादेव प्रसादे, परशराम पाटील, शशिकांत पाटील, भगवान वणकुद्रे, एन. एस. पाटील, विठ्ठल पावले, मोहन झेंडे, नेताजी सुभेदार, विलास पाटील उपस्थित होते. उपसरपंच एन. एस. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व्ही. जी. गावडे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.