कोल्हापूर

शहरात आढळले बालभिक्षेकरी

CD

65847

शहरात आढळले तीन बालभिक्षेकरी
प्रशासनातर्फे संयुक्त शोध मोहीम; दोन महिलांसह मुलांना बंधपत्रे लिहून घेऊन सोडले

नंदिनी नरेवाडी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्टँड, अंबाबाई मंदिर परिसर, सीपीआर, दसरा चौक व रंकाळा येथे छापे टाकून तीन बालभिक्षेकरींना प्रशासनाने ताब्यात घेतले. बुधवारी (ता. २१) जिल्हा महिला व बाल विकास, जिल्हा बालसंरक्षण कक्ष, पोलिस, आरोग्य विभाग आणि अवनि संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात बालभिक्षेकरी शोध मोहीम राबवण्यात आली. यात हॉकी स्टेडियम चौकात लहान मुलांना घेऊन भीक मागणाऱ्या महिला निदर्शनास आल्या. त्यांच्याकडे तीन महिने, दीड वर्ष आणि सहा वर्षांचे एक अशी तीन बालके आढळून आली.
शहरातील गर्दीच्या ठिकाणी अनेक माता चिमुकल्या मुलांना घेऊन भीक मागतात. मुलांची अवस्था पाहून अनेकदा समाजातील संवेदनशील व्यक्ती काही रक्कम या मुलांच्या हातात ठेवतात. याचाच गैरफायदा घेऊन कर्नाटकासह महाराष्ट्रातील बीड, सांगली, सोलापूर येथील काही कुटुंबे कोल्हापुरात येतात. गर्दी किंवा सणाच्या निमित्ताने मुलांना मांडीवर घेऊन किंवा पाठीवर बांधून भीक मागतात. शहरात असे प्रसंग वारंवार दिसू लागल्याने प्रशासन ‘अलर्ट मोड’वर आले आहे.
बुधवारी त्यांनी पोलिस विभागाची मदत घेऊन तावडे हॉटेल, मध्यवर्ती बस स्थानक, रेल्वे स्टेशन, सीपीआर, दसरा चौक, अंबाबाई मंदिर परिसर, रंकाळा व हॉकी स्टेडियम चौकात शोध मोहीम राबविली. प्रत्यक्षात एखाद्या बालकाला घेऊन पालक भीक मागत नाहीत, तोपर्यंत कारवाई करण्यावर मर्यादा असते. हॉकी स्टेडियम परिसरात बीड येथील दोन महिला लहान मुलांना घेऊन भीक मागत असल्याच्या आढळल्या. त्यांना ताब्यात घेऊन बाल कल्याण संकुल, मंगळवार पेठ येथे दाखल केले. या मुलांना घेऊन पुन्हा भीक मागणार नाही, अशी बंधपत्रे लिहून घेऊन त्यांना सोडले आहे. पुन्हा असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांना दिला. सहायक पोलिस निरीक्षक स्वाती यादव, उपनिरीक्षक डी. टी. सुतार, व्ही. एल. लाखे, एस. जी. हातरोटे या पोलिसांच्या मदतीने चाईल्ड लाईनच्या अनुजा खुरंदळे, जुबेर शिकलगार, बाल संरक्षण कक्षाचे अभिमन्यू पुजारी, सुदेश चव्हाण यांनी ही मोहीम राबवली.
-----
दिवाळीत आढळले
१४ बालभिक्षेकरी
दिवाळीच्या ऐन खरेदी उत्सवात प्रशासनाने शोध मोहीम घेतली होती. यावेळीही गर्दीचा फायदा घेऊन भीक मागणारे १४ बालभिक्षेकरी आढळून आले होते. यात कर्नाटकातील कुटुंबासह सांगली, सोलापूर येथील बालकांचा समावेश होता. त्यावेळीही बंधपत्रे लिहून घेऊन सोडले होते. यापुढेही कोल्हापूर जिल्हा बालभिक्षेकरी मुक्त होण्यासाठी शोध मोहीम गतीने राबविण्यात येणार आहे.
----
कोट
लहान मुलांचे हक्क व अधिकार त्यांना मिळावेत, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. बालभिक्षेकरी म्हणून काम करताना त्यांचे हक्क हिरावले जातात. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही मोहीम गतीने राबविली जाणार आहे.
- सुहास वाईंगडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी.

स्वतःच्या स्वार्थासाठी काही पालक अल्पवयीन मुलांचा वापर भीक मागण्यासाठी करतात. अशांचा शोध घेण्याची मोहीम सर्व विभागांच्या सन्मवयाने राबविण्यात येणार आहे.
- स्वाती यादव, सहायक पोलिस निरीक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT