‘कोल्हापूर ते कळे
महामार्गावर नवीन
देशी झाडे लावा’
कोल्हापूर ः कोल्हापूर ते कळे राष्ट्रीय महामार्गावर तोडलेल्या झाडांच्या ठिकाणी रस्ते ठेकेदारांकडून नवीन देशी झाडे लावावीत अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप शिष्ठमंडळातर्फे वनविभागाचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांना आज निवेदनद्वारे दिला.
राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यापूर्वी रस्त्याच्या दुतर्फा असलेली वृक्षसंपदा ठेकेदाराने रस्ते कामसाठी तोडली. रस्त्याचे ८० टक्केवर काम झाले आहे. उर्वरित काम उरकण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न दिसत आहे. जी झाडे तोडली आहेत त्याच ठिकाणी देशी झाडे ठेकेदाराने लावलेली नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. जी गुरुप्रसाद यांनी सांगितले की, संबंधित ठेकेदाराला दोन वेळा नोटीस काढली आहेत. मंगळवारी आणखी एक नोटीस काढून कार्यवाही करून घेऊ. स्त्यावरची झाडे लावून होणार नाहीत, तोपर्यंत नव्याने मंजूर झालेला कळे ते गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावरील झाडे तोडण्यास परवानगी देणार नाही. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दिग्विजय पाटील, सागर नाईक व स्वप्निल पाटील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.