कोल्हापूर

कर्म करताना सावध रहाणे हेच सुखी जीवनाचे गुपित

CD

फोटो 66108

कर्म करताना सावध राहणे हेच
सुखी जीवनाचे गुपित : पालव

जीवनविद्या मिशन ज्ञानकेंद्राचा रौप्यमहोत्सव

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः सद्‌गुरू श्री. वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशनच्या ज्ञानसाधना केंद्र, कोल्हापूरचा रौप्यमहोत्सवाचा उद्‌घाटन सोहळा ‘जीवनविद्या मिशन’चे ज्येष्ठ प्रबोधनकार शिवाजीराव पालव यांच्या जाहीर समाजप्रबोधनाने झाला. त्यांनी कर्म करताना सावध रहावे हेच सुखी जीवनाचे गुपित असल्याचे सांगितले.
राजारामपुरीतील सूर्या मल्टिपर्पज हॉलमधील या कार्यक्रमात श्री. पालव यांनी मार्गदर्शन केले. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा सिद्धांत संपूर्ण मानव जातीला सद्‌गुरुंनी दिला. आपले नशीब आपणच कसे घडवतो, लोकांनी दैववाद प्रारब्ध वाद यावर विसंबून न राहता आपल्यामध्ये असणाऱ्या शक्तीचा वापर करून जीवनात उत्तुंग भरारी घेता येते. यशस्वी, समाधानी, आनंदी जीवन जगता येते, हे सद्‌गुरूंचे विचार श्री. पालव यांनी उपस्थितांना समजावून सांगितले.
या कार्यक्रमात कोल्हापूरच्या ज्ञानसाधना केंद्राची स्थापना करणाऱ्या नामधारकांचा, या प्रवचनकारांचा आणि ‘चिंतन हाच चिंतामणी’ हा कार्यक्रम आकाशवाणीवर सुरू करण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेले ‘एमआयडीसी’चे उपअभियंता अजयकुमार रानगे यांचा श्री. पालव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योगपती श्री. डाके, उज्वला डाके, दिंगबर जगताप, डॉ. वैशाली वीरकर, प्रकाश वीरकर, संग्राम जाधव, विजय मोहिते, सूर्यकांत दोडमिसे, सागर सारंग, सागर चव्हाण उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Education: JEE-NEET साठी आता मोफत कोचिंग! घरबसल्या IIT प्रोफेसर्सकडून फ्रीमध्ये शिका; जाणून घ्या कुठे?

नाशिकमध्ये नवं कांड! तुरुंगात मदतीसाठी 'ओली पार्टी', ३ अधिकाऱ्यांनी आरोपींसोबत ढोसली दारू; तोतया IPSने आयोजन केल्याचा संशय

IPL 2026, MI vs RR: रोहित शर्मानंतर फक्त 'सूर्या'! मुंबई इंडियन्ससाठी 'असा' विक्रम फक्त दोघांच्याच नावावर

'मृणालने अमेरिकेत बाळाचा एकटीनं सांभाळ केला' काव्याने सांगितला नंदिनीच्या खऱ्या आयुष्यातील गरोदरपणातील अनुभव, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT